'मै नही हम'च्या माध्यमातून नरेंद्र मोदी आयटी प्रोफेशनल्सना जोडणार समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेशी
नरेंद्र मोदी (फाइल फोटो)

भारतीय आयटी प्रोफेशनल्सची जगभरात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. केवळ आयटी प्रोफेशनमुळे सर्व सामान्यांना 300 सुविधा मिळतात. त्यामुळे आयाटी प्रोफेशनल्समधून समाजसेवा या संकल्पनेतून मोदी सरकार 'सेल्फ फॉर सोसायटी' हा उपक्रम घेऊन आले आहेत. 'मै नही हम' असा या संकल्पनेचा संदेश आहे.

भारतामध्ये बंगळूरू, गुडगाव, हैदराबाद या शहरांमध्ये अनेक भारतीय तरूण आय टी क्षेत्रामध्ये काम करत आहेत. मात्र आता या कामाच्या जोडीला समाजसेवेची जोड देण्यासाठी नवी दिल्लीमध्ये लाखो आयटी प्रोफेशनल्सना मोदी संबोधित करणार आहेत. आयटी क्षेत्रातील तरूणांनी सामाजिक परिवर्तनामध्ये सहभागी व्हावे असे नरेंद्र मोदींचे या उपक्रमामागील व्हिजन आहे.

आज दिल्लीच्या नेहरू स्टेडियममध्ये लाखो आयटी प्रोफेशनल्स उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमामध्ये 'मै नही हम' वेब पोर्टल आणि अ‍ॅप लॉन्च करण्यात येणार आहे. या माध्यामातून सामाजिक कामं शेअर करण्याची संधी मिळणार आहे. त्याचे गुडनेस पॉईंट्सदेखील आय टी प्रोफेशनल्सना मिळणार आहेत.