PM Modi To Visit Kuwait: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) 21-22 डिसेंबर 2024 रोजी कुवेतचे (Kuwait) अमिर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह (Sheikh Meshal Al-Ahmad Al-Jaber Al-Sabah) यांच्या निमंत्रणावरून कुवेतला भेट देणार आहेत. 43 वर्षांतील भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच कुवेत दौरा (Kuwait Visit) असेल. दौऱ्यादरम्यान पंतप्रधान कुवेतच्या नेतृत्वाशी चर्चा करतील. बुधवारी परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, पंतप्रधान कुवेतमधील भारतीय समुदायाशीही (Indian Community In Kuwait) संवाद साधणार आहेत. भारत आणि कुवेतचे जवळचे आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत, जे इतिहासात रुजलेले आहेत. भारत हा कुवेतच्या प्रमुख व्यापारी भागीदारांपैकी एक आहे.
या भेटीमुळे भारत आणि कुवेतमधील बहुआयामी संबंध अधिक दृढ करण्याची संधी मिळेल, असे एमईएच्या निवेदनात म्हटलं आहे. या महिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदींनी कुवेतचे परराष्ट्र मंत्री एच.ई. अब्दुल्ला अली अल-याह्या यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, तंत्रज्ञान, संस्कृती आणि लोकांशी मजबूत संबंधांमध्ये सहकार्य वाढवण्याच्या उपायांवर चर्चा केली होती. आपल्या संभाषणादरम्यान, पंतप्रधानांनी कुवेतमध्ये राहणाऱ्या 10 लाख सशक्त भारतीय समुदायाची काळजी घेतल्याबद्दल कुवेतच्या नेतृत्वाचे आभार मानले होते. (हेही वाचा -Lok Sabha Winter Session: अमित शहांवर आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप; विरोधकांवर घणाघाती टीका करत पंतप्रधान मोदींनी सांभाळली बाजू)
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी GCC च्या कुवेतच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारत आणि गल्फ कोऑपरेशन कौन्सिलमधील घनिष्ठ सहकार्य अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी पश्चिम आशियातील परिस्थितीवर विचारांची देवाणघेवाण केली आणि या प्रदेशात शांतता, सुरक्षा आणि स्थिरता येण्यासाठी पाठिंबा व्यक्त केला. तथापी, पंतप्रधानांनी लवकरात लवकर देशाला भेट देण्याचे कुवेत नेतृत्वाचे निमंत्रण स्वीकारले आहे. (हेही वाचा -'One Nation One Election' Bill: लोकसभेत मांडले गेले ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ विधेयक; विरोधकांनी केला विरोध (Watch))
PM Modi will visit Kuwait on 21-22 December 2024, at the invitation of Sheikh Meshal Al-Ahmad Al-Jaber Al-Sabah, the Amir of the State of Kuwait. This will be the first visit of an Indian Prime Minister to Kuwait in 43 years. During the visit, the PM will hold discussions with… pic.twitter.com/afBN86GdOQ
— ANI (@ANI) December 18, 2024
परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचा कुवेत दौरा -
ऑगस्टच्या सुरुवातीला परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी कुवेतला भेट दिली होती. त्यावेळी जयशंकर यांनी भारत-कुवैत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर कुवेती नेतृत्वाशी चर्चा केली होती. परराष्ट्र मंत्र्यांनी कुवेतीचे पंतप्रधान शेख मुहम्मद सबाह अल-सालेम अल-सबाह आणि क्राउन प्रिन्स शेख सबाह अल-खालेद अल-सबाह यांची भेट घेऊन भारत-कुवेत द्विपक्षीय संबंधांना उच्च पातळीवर नेण्यासंदर्भात चर्चा केली.