PM Narendra Modi (PC - ANI)

Pariksha Pe Charcha: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांशी केलेली चर्चा आता देशातच नव्हे तर जगभरातील विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होत आहे. 27 जानेवारी रोजी होणाऱ्या 'परीक्षा पे चर्चा' (Pariksha Pe Charcha) या कार्यक्रमासाठी यावेळी जगातील 155 देशांतील विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी केली आहे. यातील बहुतांश भारतीय वंशाचे विद्यार्थी आहेत.

यंदा विद्यार्थ्यांची संख्या दुपटीने वाढली -

गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुपटीहून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी परीक्षेच्या चर्चेसाठी नोंदणी केली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, यावेळी 38.80 लाखांहून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी पंतप्रधानांशी प्रस्तावित परीक्षेबाबत चर्चा करण्यासाठी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षी केवळ पंधरा लाख लोकांनी नोंदणी केली होती. (हेही वाचा - 74th Republic Day: 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले - हा प्रसंग विशेष आहे)

ही चर्चा 27 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर होणार आहे. यामध्ये सुमारे अडीच हजार विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांची प्रत्यक्ष उपस्थिती राहणार असून, देशातील आणि जगातील इतर सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना या आभासी चर्चेने जोडण्याची तयारी सुरू आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, यावेळी पंतप्रधान मोदींनी लिहिलेल्या Exam Warriors या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीचे प्रकाशन करण्यात येणार आहे. जे सर्व प्रमुख भारतीय भाषांमध्ये तयार करण्यात आली आहे.