पेट्रोल-डिझेलच्या (Petrol And Diesel Prices) दरात गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने वाढ होत असल्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. कोरोना माहामारीमुळे आधीच आर्थिक तंगीत आलेल्या सर्वसामन्यांच्या खिशावर मोठा ताण पडत आहे. दरम्यान, पेट्रोल-डिझेलचे दर शंभरीकडे झुकले आहेत. देशात आज सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. नवी दिल्लीत आज पेट्रोलच्या किंमतीत 26 पैशांनी तर, डिझेलच्या किंमतीत 30 पैशांनी वाढ झाली आहे. तसेच इतर शहरातही इंधनाच्या किंमती गगनाला भिडल्या असून अनेक शहरात पेट्रोलच्या किंमतीने 90 रुपायांचा आकडा ओलांडला आहे. आर्थिक राजधानी मुंबईत आज किंमत 94 रुपये प्रति लीटरच्या जवळपास पोहचली आहे. लवकरच हा आकडा शंभर ओलांडण्याची शक्यता आहे.
सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा एकदा वाढवल्या आहेत. या वाढत्या किंमतींमुळे ग्राहकांच्या समस्या आणखी वाढवणार आहेत. मुख्यत: डिझेलच्या वाढणाऱ्या किंमतीचा परिणाम सामान्यांवर होणार आहे. तेल कंपन्या या दररोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर करते. यानुसार, आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे देखील वाचा- FASTag ची डेडलाईन जवळ येतेय; 15 फेब्रुवारी पासून फास्ट टॅग शिवाय टोल नाका ओलांडणं होईल कठीण
पेट्रोल-डिझेलचे आजचे दर-
शहर | पेट्रोल | डीजल |
दिल्ली | 87.85 रुपये | 78.03 रुपये |
मुंबई | 94.36 रुपये | 84.94 रुपये |
कोलकाता | 89.16 रुपये | 81.61 रुपये |
चेन्नई | 90.18 रुपये | 83.18 रुपये |
यावर्षी आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर चार रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान, जागतिक तेलाच्या बेंचमार्क ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 60 च्या पुढे गेली आहे, जी मागील वर्षातील सर्वाधिक आहे.