FASTag, Toll Plaza | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

केंद्र सरकारने फास्ट टॅग आता देशभर बंधनकारक केला आहे. त्यामुळे आता तुम्हांला हायवे वर टोल द्यायचा असेल तर तो या फास्ट टॅगच्या माध्यमातून कापला जाणार आहे. दरम्यान पूर्वी सरकारने 31 डिसेंबर पर्यंतच मुदत दिली होती नंतर त्याला 15 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली मात्र आता अजून याला मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे तुम्हांला वेळ आणि दंड वाचवायचा असेल तर 15 फेब्रुवारी पूर्वीच तुमच्या गाडीला फास्ट टॅग लावून घेण्यास विसरू नका. FASTag ला आता Prepaid touch and Go Card चा पर्याय; NHAI ची 1 जानेवारीपासून नवी सुविधा.

 

दरम्यान फास्ट टॅग ही National Electronic Toll Collection सोबत इलेक्ट्रोनिक पेमेंट सिस्टिम सोबत काम करणार आहे. त्याला नॅशनल पेमेंट्स कॉरपरेशन ऑफ इंडियाने बनवलं आहे. RFID टेक्निक सोबत त्याला वापरलंजाणार आहे. त्यामुळे टोल घेण्यासाठी प्रत्यक्ष आर्थिक देवाण घेवाण करण्याची गरज नाही. गाडीच्या विंडशील्ड वर एक स्टीकर लावले जाईल. त्यामध्ये रेडिओ फ़्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन मध्ये बारकोड असे. हा कोड गाडीच्या रजिस्ट्रेशन डिटेल्स सोबत जोडलेला असेल. त्यामुळे त्याच्याशी संलग्न अकाऊंटमधून पैसे अअपोआप कापले जाणार आहेत.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण ने 2019 मध्ये फास्टटॅग प्रणाली सुरू केली आहे. यामध्ये फास्टटॅग द्वारा आता देशभर 75-80% टोल घेतला जातो. पण 15 फेब्रुवारी पासून फास्टटॅग बंधनकारक होणार असल्याने तो 100% केला जाईल.

फास्टटॅग 5 वर्षांपर्यंत वॅलिड राहणार आहे. मात्र तुम्ही विविध युपीआय अकाऊंटद्वारा करत असलेला रिचार्ज कोणत्याही ठराविक व्हॅलिडीटीसाठी नाही. तुमचा फास्टटॅग जोपर्यंत व्हॅलिड तो पर्यंत त्यामधील रिचार्ज व्हॅलिड राहणार आहे.