Toll Tax Increase: एक्स्प्रेस वेवरील प्रवास महागणार! NHAI ने वाढवला टोल टॅक्स, आता भरावे लागणार अधिकचे पैसे | 📰 LatestLY मराठी
Close
Advertisement
  सोमवार, सप्टेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
54 seconds ago

Toll Tax Increase: एक्स्प्रेस वेवरील प्रवास महागणार! NHAI ने वाढवला टोल टॅक्स, आता भरावे लागणार अधिकचे पैसे

आता एक्स्प्रेस वेवरचा प्रवास महाग झाला आहे! भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) देशभरातील सर्व द्रुतगती मार्गावरील टोल करात सरासरी 5 टक्क्यांनी वाढ केली आहे. हा नवा टोल टॅक्स सोमवार, 3 जूनपासून लागू होणार आहे. घाऊक किंमत निर्देशांक (CPI) आधारित चलनवाढीच्या बदलानुसार NHAI दरवर्षी टोल टॅक्समध्ये बदल करते. NHAI ने 1 एप्रिलपासून दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेवरील टोल शुल्कात 5 ते 10 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. आता ही मंजुरी मिळाली आहे.

बातम्या Shreya Varke | Jun 03, 2024 11:58 AM IST
A+
A-
Toll (Photo Credits PTI)

Toll Tax Increase: आता एक्स्प्रेस वेवरचा प्रवास महाग झाला आहे! भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) देशभरातील सर्व द्रुतगती मार्गावरील टोल करात सरासरी 5 टक्क्यांनी वाढ केली आहे. हा नवा टोल टॅक्स सोमवार, 3 जूनपासून लागू होणार आहे. घाऊक किंमत निर्देशांक (CPI) आधारित चलनवाढीच्या बदलानुसार NHAI दरवर्षी टोल टॅक्समध्ये बदल करते. NHAI ने 1 एप्रिलपासून दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेवरील टोल शुल्कात 5 ते 10 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. आता ही मंजुरी मिळाली आहे. सध्या या एक्स्प्रेस वेवर टोल शुल्क प्रति किलोमीटर २.१९ रुपये आहे. हा बदल १ एप्रिलला होणार होता, पण लोकसभा निवडणुकीमुळे तो पुढे ढकलण्यात आला. देशात जवळपास 855 टोल प्लाझा आहेत जिथे टोल टॅक्स वसूल केला जातो. यापैकी सुमारे 675 सार्वजनिक अनुदानित प्लाझा आहेत आणि 180 सवलतीधारकांकडून चालवले जातात. हे देखील वाचा: Toll Tax Increase: एक्सप्रेसवे पर सफर हुआ महंगा! NHAI ने बढ़ाए टोल टैक्स, अब चुकाने होंगे इतने पैसे

2022 मध्ये टोल टॅक्स मर्यादा 10 ते 15 टक्क्यांनी वाढवण्यात आली होती, राष्ट्रीय महामार्गांवर चालणाऱ्या सर्व प्रकारच्या कारसाठी टॅरिफ शुल्क 10 रुपयांवरून 60 रुपये करण्यात आले होते.

 नव्या टोल टॅक्सचा परिणाम सर्व एक्सप्रेसवे वापरकर्त्यांवर होणार आहे. एक्स्प्रेस वेवर प्रवास करण्यासाठी आता तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत.


Show Full Article Share Now