मुंबई : पेट्रोल २० पैशांनी तर डिझेल १९ पैशांनी स्वस्त
पेट्रोल-डीजल (Photo Credits: Getty)

आंतरराष्ट्रीय बाजारात कमी होणाऱ्या तेलाच्या किमती पाहता मुंबई, दिल्ली भागातही पेट्रोल आणि डिझेल चे दर कमी होत आहेत. दिवाळी पाडाव्या दिवशी मुंबईत पेट्रोल २० पैशांनी तर डिझेल १९ पैशांनी कमी झाले आहेत. मुंबईत पेट्रोलच्या किंमती ८३ रुपये ७२ पैसे प्रति लिटर आणि डिझेलची प्रति लिटर किंमत ७६ रुपये ३८ झाली आहे.

मागील आठवड्या भरात सातत्याने पेट्रोल आणि डिझेलचे दार कमी होत आहेत त्यामुळे सामान्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही गोष्ट दिलासा देणारी ठरली आहे. जागतिक स्तरावर घडणाऱ्या अनेक घटनांचा थेट परिणाम पेट्रोल आणि डीझेलच्या किमतींवर होत होता. परिणामी वाढत्या इधंदारामुळे भाजीपाल्याचे दार, महागाई दर देखील वाढणार अशी भीती होती. मात्र आता . कमी होणाऱ्या किमती सामान्यांसाठी आल्हाददायक दिवाळी गिफ्ट आहे.

 

मुंबई प्रमाणेच दिल्लीतही पेट्रोल आणि डीझेल चे दार कमी होत आहे. आह . दिल्लीत पेट्रोल ७८ रुपये २१ पैसे प्रति लिटर आणि डीझेल ७२ रुपये ८९ पैसे प्रति लिटर झाले आहे. दिल्लीत पेट्रोल २१ पैशांनी तर डिझेल १८ पैशांनी कमी झाले आहे.