Railway Recruitment 2021: उत्तर मध्य रेल्वेमध्ये आयटीआय पास ही तरुणांसाठी अप्रेंटिसशिप करण्याची सुवर्णसंधी, 1664 पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरू
Indian Railway (Photo Credits: File Photo)

उत्तर मध्य रेल्वेमधील (North Central Railway) आयटीआय (ITI) पास ही तरुणांसाठी अप्रेंटिसशिप (Apprenticeship) करण्याची सुवर्णसंधी आहे. रेल्वेने शिकाऊ उमेदवाराच्या 1664 पदांवर भरती (Recruitment) घेऊन अर्जाची प्रक्रिया सुरू केली आहे. पात्र उमेदवार RRC उत्तर मध्य रेल्वेच्या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज (Apply online) भरू शकतात. या पदांवरील उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना 1 वर्षाचे प्रशिक्षण दिले जाईल आणि या दरम्यान त्यांना दरमहा स्टायपेंड दिला जाईल. या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असावेत. उमेदवारांकडे संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

ऑनलाइन अर्जप्रक्रिया 2 नोव्हेंबर 2021 पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 डिसेंबर 2021 आहे. अर्ज फी जमा करण्याची शेवटची तारीख 1 डिसेंबर 2021 असेल. परीक्षा / गुणवत्ता यादी जारी करण्याची तारीखेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. हेही वाचा Gold Quality and Purity: 22 कॅरेट, 23 आणि 24 Carat सोने म्हणजे काय? तिन्हीमध्ये नेमका फरक काय?

वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास, अर्जदारांचे किमान वय 15 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळेल. सर्वसाधारण आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपये आहे.  याशिवाय SC-ST, दिव्यांग आणि सर्व प्रवर्गातील महिलांसाठी अर्ज विनामूल्य आहे. अर्जाची फी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंगद्वारे जमा केली जाऊ शकते.

शिकाऊ उमेदवारांच्या या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, पात्र उमेदवारांना रेल्वे रिक्रूटमेंट सेल, उत्तर मध्य रेल्वेच्या https://ncr.indianrailways.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल . येथे तुम्हाला अर्जाची लिंक आणि भरतीची अधिसूचना मिळेल. सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना वाचावी. अर्जात चूक झाल्यास तो नाकारला जाऊ शकतो.