Nitish Kumar Takes Oath As Bihar CM: नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी पुन्हा एकदा बिहार (Bihar) च्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. रविवारी बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. यासह नितीश कुमार यांनी नवव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळवला आहे. मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळण्यापूर्वी रविवारी नितीशकुमार यांनी महाआघाडीशी संबंध तोडून राजभवनात जाऊन राजीनामा दिला. यानंतर त्यांची प्रथम JDU आमदार म्हणून आणि नंतर NDA विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली.
राज्यपालांनी नितीश कुमार यांच्यासह 9 जणांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नितीश कुमार यांच्याशिवाय भाजपच्या कोट्यातून उपमुख्यमंत्रीपद मिळालेल्या दोन चेहऱ्यांमध्ये सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांचा समावेश आहे. नितीश कुमार यांच्यानंतर सम्राट चौधरी यांनी शपथ घेतली. याशिवाय विजय चौधरी, श्रवण कुमार, डॉ.प्रेम कुमार, संतोष कुमार सुमन, विजेंद्र यादव, सुमित सिंह यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. (हेही वाचा -Tejashwi Yadav on Nitish Kumar: एनडीएमध्ये जाण्यावरून तेजस्वी यादव यांचा नितीश कुमारांवर हल्ला, म्हणाले- 'खेळा अभी बाकी है, आम्ही जनतेसोबत आहोत')
#WATCH | Nitish Kumar takes oath as Bihar CM for the 9th time after he along with his party joined the BJP-led NDA bloc. pic.twitter.com/ePGsqvusM3
— ANI (@ANI) January 28, 2024
या शपथविधी सोहळ्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, एलजेपी (रामविलास) राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान, पशुपती पारस, जितन राम मांझी यांच्यासह एनडीए घटक पक्षांचे सर्व नेते उपस्थित होते.
नितीश कुमार यांनी आपल्या राजकीय कार्किदित आठ वेळा बिहारचे मुख्यमंत्रीपद भूषवले. 28 जानेवारीला जेव्हा नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा ते बिहारचे नवव्यांदा मुख्यमंत्री बनले.