Himachal Pradesh Accident: लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारी पिकअप व्हॅन दरीत कोसळली; 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू, 3 जण जखमी
Himachal Pradesh Accident (Photo Credit: ANI)

लग्नाचे वऱ्हाड आटपून परतणारे वाहन दरीत कोसळल्याने भीषण अपघात (Accident) घडला आहे. हिमाचल प्रदेशच्या (Himachal Pradesh) सिरमौर जिल्ह्यात (Sirmaur) ही घटना घडली असून 9 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर, 3 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद केली आहे. हा अपघात नेमके कशामुळे घडला आहे? याबाबत अद्याप कोणतीच माहिती मिळाली नसून पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे. यासंदर्भात एएनआय वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वऱ्हाडींना घेऊन जाणारी पिकअप हॅन पच्छड विभागाच्या बाग पाशेंग या डोंगराळ भागातून जात होते. दरम्यान, चालकाचा ताबा सुटल्यामुळे वाहन दरीत कोसळली. ज्यात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 3 जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात मरण पावलेल्या लोकांची ओळख पटली नसून स्थानिक पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. हे देखील वाचा-Delhi Murder: दारूची तलब भागवण्यासाठी 45 वर्षीय व्यक्तीची केली हत्या, दिल्ली येथील 3 अल्पवयीन मुलांना अटक

एएनआयचे ट्वीट-

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर दुख: व्यक्त केले आहे. तसेच या दुर्घटनेत मरण पावलेल्या लोकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर, जखमींना 50 हजाराची मदत जाहीर केली आहे.

एएनआयचे ट्वीट-

याआधी जम्मू-श्रीनगरच्या राष्ट्रीय महामार्गावर रामबन जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी कार दरीत कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. यात सीआरपीएफच्या जवानासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. तर, एक जण गंभीर जखमी झाले होते.