COVID-19 Vaccine Update: झायडस कॅडिला च्या ZyCoV-D कोविड-19 लसीला आपत्कालीन वापरासाठी केंद्राची मंजुरी
Zydus (Photo Credits: Twitter)

झायडस कॅडिला (Zydus Cadila) च्या कोविड-19 लसीला (Covid19 Vaccine) केंद्र सरकारने आपात्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ट कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या (Central Drugs Standard Control Organisation) तज्ञ समितीने झायडस कॅडिला परवानगी मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे गुरुवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर आज या लसीला आपात्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. (Covid-19 Vaccine: भारत ठरू शकतो DNA आधारीत लस तयार करणारा जगातील पहिला देश; ZyCoV-D ची तिसऱ्या टप्यातील चाचणी सुरु)

कॅडिला हेल्थ केअर लिमिडेट या अहमदाबाद स्थित कंपनीने या लसीच्या मंजुरीची शिफारस DCGI कडे केली होती. यासंदर्भात 1 जुलै रोजी अर्ज करण्यात आला होता. देशभरातील 50 ट्रायल्स सेंटरमध्ये 27,000 हून अधिक स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली असून ही लस 66.6 टक्के इतकी प्रभावशाली आहे. 12 वर्षावरील 1 हजार मुलांना देखील ही लस देण्यात आली होती.

ANI Tweet:

ZyCoV-D या लस Sars-CoV-2 ची प्रोटीन पातळी वाढते. ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती अधिक बळकट होते. यासोबतच ही लस निडल फ्री असल्यामुळे लसीचे दुष्परिणाम कमीत कमी होतील. आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळालेली ही देशातील सहावी लस आहे. ही लस प्रौढांसोबतच 12 ते 18 वर्षांच्या मुलांनाही देता येईल, अशी माहिती कॅडिला हेल्थकेअरचे मॅनेजिंग डिरेक्टर शार्विल पटेल यांनी दिली.

दरम्यान, यापूर्वी देशात कोव्हॅसिन, कोविशिल्ड, स्पुटनिक, मॉर्डना, जॉन्सन अँड जॉन्सन या लसींना वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. त्यात आता अजून एका लसीची भर पडली आहे. सध्या देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे अधिकाधिक लसीकरण करणे महत्त्वाचे आहे. यात आता झायडस कॅडिला मंजुरी मिळाल्याने सीकरण मोहिम अधिक मजबूत होण्यास नक्कीच मदत होईल.