
हल्ली जेवण घरी बनवायला कंटाळा आला, बाहेर पडायला वेळ नसला की जेवण ऑर्डर करणं हा शहरी भागातील लोकांसाठी एक सर्वोत्तम पर्याय झाला आहे.तुम्हीही महिन्यात किमान दोन-चार वेळेस तरी ऑनलाई फुड ऑर्डर करतचं असाल. पण फुड ऑर्डर करताना त्या ऑर्डवर आपल्याला अधिकाधिक ऑफर कशी मिळेल आपण याचं शोधात असतो. तरी डिलेव्हरी चार्जेस आणि जेवणाची किंमत असं मिळून फआर फार तर तुम्ही हजारांचे फुड ऑर्डर केले असाला. पण पुणे तेथे काय उणे! पुण्याच्या या पठ्ठ्याने काही हजारांचं नाही तर चक्क २८ लाखांचं जेवण झोमॅटोवरुन ऑर्डर केल आहे. झॉमॅटोच्या हा ग्राहकाचं नाव तेजस असुन ह्याने २०२२ या वर्षभरात तब्बल २८ लाखांचं जेवण झोमॅटोवरुन ऑर्डर केलं आहे. एवढचं नाही तर या पढ्याचं एका वेळचा एकचं ऑर्डर २५ हजारांहून अधिक किमतीचा असुन यांत तेजसने तब्बल २५ हजारांचे पिझ्झा मागवले होते.
झोमॅटोने नुकताचं आपला वार्षिक अहवाल सादर केला असुन त्यात देशात सर्वाधिक किमतीचं जेवण ऑर्डर करणारा म्हणून तेजसचं नाव अव्वल क्रमांकावर आहे. तरी यातून पुणेकरांच्या खव्वैया वृत्तीचं प्रदर्शन होते. कारण यापूर्वीही फुड डिलीव्हरी कंपनी स्विगीने आपला वार्षिक अहवाल जाहीर केला होता. त्यात देखील पुणेकरानेचं बाजी मारली असुन तब्बल ७१ हजारांचा फुड ऑर्डर त्याने केला होता. (हे ही वाचा:- Rs.71000 Food Order: बॉस असावं तर असा! बॉसकडून कर्मचाऱ्यांसाठी तब्बल ७१ हजारांच्या जेवण ऑर्डर)
तरी झॉमॅटो या फुड डिलिव्हरी अपवरुन सर्वाधिक ऑर्डर केलेला पदार्थ म्हणजे बिर्याणी आणि दुसरा क्रमांक लागतो तो पिझ्झा. २०२२ या वर्षभरात झोमॅटोवर फुड ऑर्डर करताना ग्राहकांनी बिर्याणी आणि पिझ्झा या दोन पदार्थांना सर्वाधिक पसंती दाखवली आहे. तरी २०२३ यावर्षाच्या पहिल्याचं दिवशी झोमॅटोकडून भन्नाट ऑफर देवू केलेले आहेत.