Road Accident

चेन्नई (Chennai) शहरात घडलेल्या हिट-अँड-रन (Hit-and-Run) प्रकरणात वायएसआर काँग्रेस पार्टी (YSRCP) राज्यसभा खासदार बीडा मस्तान राव (Beeda Masthan Rao) यांची कन्या माधुरी हिचे नाव आले आहे. माधुरी हिने कथीतरित्या बेदरकारपणे कार चालवत फुटपाथवर झोपलेल्या सूर्या नामक 21 वर्षीय तरुणाला चिरडले. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. ज्यामध्ये सूर्या याचा मृत्यू झाला. सूर्या व्यवसायाने चित्रकार असल्याचे समजते. चेन्नई पोलिसांनी या प्रकरणात माधुरी हिस अटक केली मात्र नंतर अल्पावधीतच तिची जामिनावर सुटका झाली.

चेन्नई चेन्नई हिट-अँड-रन घटनेचा तपशील

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना सोमवारी रात्री घडली. वायएसआरसीपी खासदार यांची कन्या माधुरी ही आपली बीएमडब्लू कारने शहरातील बेसंट नगरमधील रस्त्यावरुन निघाली होती. याच वेळी सूर्या नामक कथीत चित्रकार फुटपाथवर झोपला होता. माधुरीने हिने आपले वाहन बेदरकारपणे हाकले. ज्यामुळे ते अनियंत्रित होऊन फुटपाथवर चढले आणि या वाहनाने सूर्या याच्यासह आणखी एका महिलेला धडक दिली. याघटनेत सूर्या याचा मृत्यू झाला तर दुसरी महिला जखमी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, घटना घडल्यानंतर माधुरी हिने घटनास्थळावरुन पळ (Hit-and-Run in Chennai) काढला. या वेळी तिच्यासोबत कारमध्ये आणखी एक महिला होती. (हेही वाचा, Pune Hit And Run Accident: पुणे जिल्ह्यात पुन्हा 'हिट अँड रन'; पिंपरी चिंचवड परिसरातील हिंजवडी येथे भरधाव कारने तरुणीला चिरडले (Watch Video))

पोलीसांकडून तातडीने तपास

घटनेची माहिती मिळताच चेन्नई पोलिसांच्या अड्यार वाहतूक अन्वेषण शाखेने आयपीसीच्या कलम 304A (निष्काळजीपणामुळे मृत्यूला कारणीभूत) एक जामीनपात्र गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कार मालकाला समन्स जारी केले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आले की, कार पुद्दुचेरीमध्ये नोंदणीकृत बीएमआर (बीडा मस्तान राव) याच्याशी संबंदित आहे. रुग्णवाहिकेला कॉल करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या फोन नंबरवरून माधुरीचा माग काढण्यात आला. (हेही वाचा, Pune Porsche Accident Case: पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरपीच्या वडिलांसह चौघांवर फसवणूकीचा आणखी एक गुन्हा दाखल)

स्थानिकांमध्ये संताप

हिट-अँड-रन प्रकरणानंतर स्थानिकांमध्ये जोरदार संताप पाहायला मिलाला. सूर्या याचे नातेवाईक आणि शेजारी शहरातील जे-5 शास्त्रीनगर पोलिस स्टेशनमध्ये जमले आणि त्यांनी आरोपीला त्वरीत अटक करुन कठोर शिक्षेची मागणी केली. माधुरीच्या मित्राने सूर्यासाठी रुग्णवाहिका बोलावल्याचा दावा करत स्थानिकांशी कथीतरित्या वाद घातला. ज्याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्याची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही.

राजकीय पार्श्वभूमी

या प्रकरणाला राजकीय वळणही मिळत आहे. कारण, माधुरी हिचे वडील बीडा मस्तान राव हे राज्यसभा सदस्य आहेत. त्या आधी ते विधानसभेत आमदार होते. शिवाय सीफूड उद्योगातील प्रमुख नाव असलेल्या BMR ग्रुपशी संबंधित आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रातही पुणे आणि नागपूर परिसरात हिट अँड रनच्या सलग घटना पाठिमागील काही दिवसांमध्ये पाहायला मिळाल्या. ज्यामुळे समाजमन ढवळून निघाले आहे आणि सामाजिक वर्तुळात संतप्त भावना उमटत आहेत.