उत्तर प्रदेश: यमुना एक्सप्रेस वे वर भीषण अपघात; बस दरीत कोसळून 29 जण ठार
UP (Photo Credits: ANI)

उत्तर प्रदेशातील यमुना एक्सप्रेसवर आज सकाळी बस रेलिंग़ तोडत थेट दरीत कोसळली आहे. या भीषण अपघातामध्ये सुमारे 29 जणांचा मृत्यू झाला असून 17 जण ठार झाले आहेत. या बसमधून 44 जण प्रवास करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे अपघातस्थळी बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. ही बस लखनऊ कडून गाजियाबादकडे जात होती. अद्याप या अपघाताचे कारण समजू शकलेले नाही.

ANI Tweet 

अपघाताचे वृत्त समजताच स्थानिक पोलिस आणि अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत. अपघातग्रस्त बसमधून 17 जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. अद्याप 17 जणांना बाहेर काढण्यात आलं असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.

अपघातग्रस्तांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मदत जाहीर केली आहे. त्यांना 5 लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे.