लग्नात गाणी वाजवल्याने वादविवाद झाला, नवऱ्याला वाचवण्यासाठी गेलेल्या बायकोचा गोळी लागून मृत्यू
Image used for representational purpose | Photo Credits: File Photo

राजधानी दिल्ली (Delhi) येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमध्ये मंगोलपुरी येथील एका लग्नात गाणी वाजवल्याने वादविवाद झाल्याने गोळीबार सुरु करण्यात आला. त्यावेळी महिलेने नवऱ्याला वाचण्यासाठी मध्ये गेली असता तिला गोळी लागून मृत्यू झाला आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, आपल्या भाचाच्या लग्नात हा गोंधळ झाल्याने ही दुर्घटना घडली आहे.

लग्नसोहळ्यातील एक व्यक्ती आणि दोन भावंडांमध्ये गाणे वाजवल्याने वाद सुरु झाला. त्यावेळी एका भावंडाने आपल्याकडील बंदूक काढून हवेत प्रथम गोळीबार करु लाागला. मात्र तेथे उपस्थित असलेल्या काकाला वाचवण्यासाठी बायकोने मध्यस्थी करण्याचे ठरविले. परंतु गोळीबार करत असताना नवऱ्याला वाचवण्यासाठी गेलेल्या महिलेचा गोळी लागून मृत्यू झाला.

या प्रकरणी आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच गोळी लागलेल्या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपाचारापूर्वी महिलेचा मृत्यू झाला आहे. तसेच अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.