भावाला शासकीय नोकरी मिळाली म्हणून छोट्या भावाने रागात घर पेटवले, चार जणांचा मृत्यू
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

पश्चिम बंगाल (West Bengal) येथे मालदा जिल्ह्यातील एका कुटुंबातील छोट्या भावाने मोठ्या भावाला शासकीय नोकरी मिळाल्याने संपूर्ण घर पेटवले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत परिवारातील चार जणांचा मृत्यू झाला असून अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. तर आरोपीने पळ काढला असून त्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

मालदा जिल्ह्यात माखन, गोविंदा आणि विकास असे तीन भावंडे एकाच घरात राहत होती. तर या तिन भावंडातील मोठा भाऊ विकास ह्याला अनुकंपा तत्वार एका शासकीय कंपनीत नोकरी मिळाली. यामुळे छोटा भाऊ माखन ह्याला विकासचा हा आनंद पाहावला नाही. त्यामुळे संतप्त होऊन माखनने संपूर्ण घर जाळल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी घडला आहे. (हेही वाचा-धक्कादायक! बायको-मुलीचा गळा दाबून मृतदेह पेटवले, पती-प्रेयसीचा संतापजनक प्रकार)

या प्रकरणी जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तर विकास आणि गोविंदा यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर अन्य जखींवर उपचार सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. तसेच माखन ह्याचा लवकरात लवकर शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.