Monsoon Update: मुंबईत आज सुद्धा अतिमुसळधार पावसाची शक्यता, जाणून घ्या अन्य ठिकाणच्या हवामानाचा अंदाज
Image For Representation (Photo Credits: PTI)

Monsoon Update: महाराष्ट्रातील विदर्भ आणि मुंबईच्या परिसरात आज अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर बंगालच्या खाडीत एक चक्रीवादळ निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हे चक्रीवादळ जसे जसे अधिक वेग धरु लागल्यास महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सर्वात प्रथम विदर्भात पावसाचा जोर पहायला मिळणार आहे. पूर्व-पश्चिम पर्यंत राज्यातील उत्तर भागात पावसाचा तडाखा बसणार आहे. मात्र काही ठिकाणी तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रानंतर पालघर, ठाणे आणि मुंबईतील किनारपट्टी भागात पाऊस पडेल असा अंदाज आहे.

तसेच ओडिशा, छत्तीसगढ, पश्चिम बंगाल, झारखंड, दक्षिण राजस्थान मधील काही भागात, विदर्भ आणि तेलंगणा येथे सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज आहे. मात्र काही ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला ही दिसून येईल. या व्यतिरिक्त उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गुजरात, कोकण आणि गोवा, अंदमान-निकोबार, आंध्र प्रदेशात हलका-मध्यम पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, रायलसीमा, कर्नाटक किनारपट्टी आणि केरळात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल.(Ganpati Visarjan 2021: वर्सोवा येथे गणपती विसर्जनदरम्यान 4 मुले पाण्यात बुडाली)

Tweet:

दरम्यान, रविवारी दिल्लीत तापमान 34.4 डिग्री सेल्सिअस दाखल करण्यात आल्याची माहिती हवामान खात्याने दिली होती. तर संध्याकाळी हवेची आद्रता 67 टक्के होती. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सोमवारी ढग जमा होतील आणि अधिकतम तापमान 35 डिग्री सेल्सिअस आणि कमीतकमी तापमान 27 डिग्री सेल्सिअस असण्याची शक्यता आहे.