Assembly Election 2021 Exit Poll Result | (File Image)

पश्चिम बंगाल (West Bengal), केरळ (Kerala), तामिळनाडू (Tamil Nadu), असम (Assam) आणि पुद्दुचेरी (Puducherry) या पाच राज्यांसाठी पार पडलेल्या विधानसभा निवडणूक 2021 मतदानाची मतमोजणी 2 मे 2021 या दिवशी होणार आहे. तर वेगवेगळ्या टप्प्यांत पार पडलेल्या या निवडणुकांचा आज (29 एप्रिल 2021) शेवटचा टप्पा आहे. या पाचपैकीअसम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी राज्यांत एकाच टप्प्यात निवडणुका पार पडल्या आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये एकूण 8 टप्प्यात मतदान पार पडले. आजचा 8 वा म्हणजेच अंतिम टप्पा आहे. आज मतदान संपताच विविध वृत्तवाहिन्या आणि संस्था सायंकाळी 6 वाजनेच्या दरम्यान Exit Polls Results जाहीर करणार आहेत विविध संस्थांपैकी एक. Aaj Tak ​एक्झिट पोल्स रिजल्ट लाईव्ह स्ट्रिमिंग आपण इथे पाहू शकता. त्यासाठी खाली दिलेली लिंक पाहा.

पश्चिम बंगाल राज्यात ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस विरुद्ध भारतीय जतना पक्ष असा सामना असल्याचे चित्र आहे. या ठिकाणी एकेकाळी डावे पक्ष विरुद्ध ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस असा सामना होता. केंद्र शासित प्रदेश असलेल्या पुद्दुचेरी येथे निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी काही दिवसच आगोदर सरकार कोसळले होते. त्यानंतर पुद्दुचेरीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. या राज्या भाजपने या वेळी स्थानिक पक्षांच्या विरोधात निवडणूक लढली आहे. दुसऱ्या बाजूला तामिळनाडू राज्यात DMK-काँग्रेस आणि AIADMK-BJP असा आघाडी करुन सामना पाहायला मिळत आहे. आसममध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस आणि आघाडी अशी लढाई आहे. Aaj Tak ​एक्झिट पोल्स रिजल्ट लाईव्ह स्ट्रिमिंग पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

पश्चिम बंगालमध्ये शेवटच्या टप्प्याचे मतदान संपताच काही वेळातच एक्झिट पोल्सचे अंदाज जाहीर होणार आहेत. आज एक्झिट पोल्सचे अंदाज काहीही आले तरी नेमके जनतेच्या मनात काय हे प्रत्यक्ष 2 मे या दिवशीच कळणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 2 मे या दिवशी पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, पद्दुचेरी आणि असम राज्याच्या निवडणूक मतदानाची मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीनंतरच वास्तव चित्र पुढे येणार आहे.