Valentine's Day 2022: उत्तर प्रदेशातील सार्वजनिक ठिकाणी कपल्सचा छळ, बजरंग दलच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
Bajrang Dal (Photo Credits-IANS)

Valentine's Day 2022: उत्तर प्रदेशातील आगरा येथील पोलिसांनी सोमवारी व्हेलेंटाइन डे च्या दिवशी सार्वजनिक ठिकाणी कपल्सचा छळ केल्याच्या आरोपाखाली बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महिलांसह संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गार्डनमध्ये पोहचत कथित रुपात तरुण-तरुणींसोबत गैरवर्तन केल्याचे दिसून आले.(Karnataka Hijab Row: कर्नाटकातील हिजाब वादावर आज पुन्हा हायकोर्टाच्या 3 सदस्यीय खंडपीठाकडून सुनावणी)

आगराचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक सुधीर कुमार सिंह यांनी असे म्हटले की, शहरात बजरंग दलाच्या सदस्यांद्वारे तरुण-तरुणींसोबत गैरवर्तन करण्यात आले. त्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. हरिपर्वत पोलिसांच्या ठाण्याअंतर्गत पालीवाल पार्कमध्ये काह तरुण-तरुणी बसले होते. त्यावेळी बजरंग दलाचे काही कार्यकर्ते तेथे आले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केला.(Gurgaon: गुडगावमध्ये दिव्यांग महिलेला रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारला, ट्विट व्हायरल होताच व्यवस्थापनाने मागितली माफी)

दरम्यान, हिंदूवादी संघटनांनी 13 फेब्रुवारीला व्हेलेंटइन डे चा विरोध केला जाईल अशी धमकी दिली होती. बजरंग दलाने पार्कमध्ये येणाऱ्या कपल्सचे लग्न लावून देणार असल्याची धमकी दिली होती. त्यांनी असे ही म्हटले होते की, तरुण-तरुणींच्या पालकांना बोलावले जाणार असून त्यांचे लग्न लावणार आहेत. या व्यतिरिक्त अखिल भारत हिंदू महासभेत पुतळ्याचे दहन करुन उद्यानांवर छापे टाकल्यानंतर उद्यानात भेटलेल्या जोडप्यांना गाढवांवर काजळ घालण्याची धमकीही दिली होती. या पार्श्वभूमीवर उद्यानांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.