Karnataka Hijab Row: कर्नाटकातील हिजाब वादावर आज पुन्हा हायकोर्टाच्या 3 सदस्यीय खंडपीठाकडून सुनावणी
Image used for representational purpose only (Photo Credits: PTI)

Karnataka Hijab Row: कर्नाटकातील हिजाब वादावर आज पुन्हा एकदा हायकोर्टाच्या तीन सदस्यीय खंडपीठाकडून सुनावणी केली जाणार आहे. ही सुनावणी दुपारी 2.30 वाजता सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याआधी न्यायाधीश कृष्णा दीक्षित यांच्या खंडपीठाखाली या प्रकरणी सुनावणी पार पडली होती. मात्र आता दीक्षित यांनी हे प्रकरण हायकोर्टाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवले आहे.(Hijab Row: शाळेत प्रवेश करताना पालक आणि शिक्षिकेमध्ये हिजाब घालण्यावरुन वाद Watch Video)

सोमावारी झालेल्या सुनावणीदरम्यान, वरिष्ठ अधिवक्ता देवत्त कामत यांनी असे म्हटले की, कॉलेज विकास समिती (सीडीसी) कडे कपड्यांवरुन नियम बनवण्याचे कोणताही कायदेशीर वैधानिक आधार नाही आहे. हिजाब घालणे हा इस्लाम धर्मात अनिवार्य आहे. जेथवर मुख्य धार्मिक प्रथांचा संबंध आहे ते कलम 25(1) मधून आले असून ते पूर्ण नाही.

सुनावणीदरम्यान, एका वकिलांनी या मुद्द्यावर मीडिया आणि सोशल मीडियावरील टिप्पण्यांवर बंदी घालण्याच्या अर्जाचा संदर्भ देत ते म्हणाले की, इतर राज्यांमध्ये निवडणुका सुरू असल्याने हे प्रकरण निवडणुकीपर्यंत स्थगित करण्यात यावे. त्यावर हायकोर्टाने म्हटले की, निवडणूक आयोगाने किंवा काही अधिकाऱ्यांनी ही विनंती केल्यास आम्ही त्यावर विचार करू शकतो.(Karnataka Hijab Controversy: उडुपी जिल्ह्यात 14-19 फेब्रुवारी दरम्यान 144 कलम लागू, भाजप आमदाराची NIA चौकशीची मागणी)

दरम्यान, हिजाब वरुन वाद अशावेळी सुरु झाला जेव्हा गेल्या वर्षात सप्टेंबर महिन्यात हिजाब घालून सहा विद्यार्थिनी आल्या होत्या. त्यानंतर महाविद्यालयात हिंदू विद्यार्थी भगवा गमछा घालून येऊ लागले. हळूहळू हा वाद राज्यातील अन्य ठिकाणी सुद्धा पसरला गेल्याने शिक्षण संस्थांमध्ये तणावाची स्थिती निर्माण होत त्याला हिंसेचे वळण लागले.