Uttarakhand Violence: उत्तराखंड हिंसाचारात 4 ठार, 250 जखमी; संचारबंदी लागू, शाळा बंद
Haldwani Violence (Photo Credit: ANI)

Haldwani Madrasa Demolition: उत्तराखंड राज्यातील काही भागात हिंसाचार (Uttarakhand Violence) उफाळला आहे. ज्यामध्ये चार नागरिकांचा मृत्यू आणि 250 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. राज्यातील नैनीताल जिल्ह्यात हल्द्वानी (Haldwani येथील बनभूलपूरा परिसरात असलेला मदरसा आणि मशिद हटविण्यासाठी महानगरपालिका (Municipal Corporation) विभागाचे काही अधिकारी बुलडोजर घेऊन पोहोचले. त्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला आणि त्याचे पर्यावसन हिंसाचारात झाले. प्रशासनाचा दावा आहे की, मदरसा आणि मशिद (Haldwani Mosque Demolition) यांचे बांधकाम अनधिकृत आहे. दरम्यान, हिंसाचार प्रभावीत परिसरात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. सर्व शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, जमावाला पांगविण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी समाजकंटक दिसताक्षणी गोळी घालण्याचे आदेस पोलीसांना देण्यात आल्याचे समजते.

कर्फ्यू लागू, इंटरनेट सेवाही बंद

नैनीताल जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वंदना सिंह यांनी हिंसाचार घडल्याच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या आदेशानुसार, हल्द्वानी परिसरात तत्काळ कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. सर्व शाळा शुक्रवारी (9 फेब्रुवारी) दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहेत. शिवाय काल (शनिवार, 8 फेब्रुवारी) रात्री नऊ वाजलेपासून परिसरातील इंटरनेटसेवाही खंडीत करण्यात आली आहे. (हेही वाचा, Uttarakhand To Implement Uniform Civil Code: उत्तराखंड विधानसभेत यूसीसी विधेयक मंजूर; ठरले समान नागरिक संहिता लागू करणारे पहिले राज्य)

व्हिडिओ

पोलीस आणि महापालिका कर्मचारी मोठ्या प्रमाणावर जखमी

उत्तराखंड पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, हिंसाचाराच्या घटनेत 100 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. ज्यामध्ये हल्द्वानी येथील उपविभागीय अधिकारी (Sub-Divisional Officer) यांचाही समावेश आहे. अर्थात प्रसारमाध्यमांनी 250 हून अधिक लोक जखमी झाल्याचे म्हटले आहे. हिंसाचारात जखमी झालेल्या नागरिकांना बनभूलपूरा परिसरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्यामध्ये जखमी पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. जे स्थानिक मदरशावर कारवाई करण्यासाठी गेले होते. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अनेक ठिकाणी इमारतींच्या छतावरुन आणि अरुंद गल्ल्यांमधून दगडफेक करण्यात आली. ज्यामुळे शेकडो नागरिक जखमी झाले. राज्याचे एडीजी तथा कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अधिकारी एपी अंशुमन यांनी म्हटले आहे की, हिंसासाचारग्रस्त परिसरात चार नागरिकांचा मृत्यू झाल आहे. तर 100 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. (हेही वाचा, उत्तराखंडातील हरिद्वारमध्ये भिंत कोसळून 6 ठार, अनेक जखमी)

व्हिडिओ

न्यायालयाच्या आदेशावरुन कारवाई केल्याचा प्रशासनाची माहिती

वरिष्ठ पोलिस अधीक्षक प्रल्हाद मीणा यांनी सांगितले की, हे बांधकाम (मशिद, मदरसा) न्यायालयाच्या आदेशाचे पालन करुन पाडण्यात आले. सरकारी जागेवर अतिक्रमण करत सदर मदरसा आणि मशिद उभारण्यात आली होती. सरकारी जमीन पूर्ववत करण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत स्थानिक सशस्त्र कॉन्स्टेब्युलरीच्या (PAC) उपस्थितीस ही इमारत पाडण्यात आली. त्यानंतर भडकलेल्या हिंसाचारानंतर खबरदारीचा उपाय म्हणून, हल्द्वानीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिणामी बाधित भागातील सर्व दुकाने आणि शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

एक्स पोस्ट

कोर्टात जनहित याचिका दाखल

दरम्यान, मशिद आणि मदरशावरील कारवाईनंतर उफाळलेल्या हिंसाचार थांबविण्यासाठी उत्तराखंड उच्च न्यायालयात एक जनहित याचिका (PIL) दाखल झाली. ज्यामध्ये बांधकाम पाडण्याची कारवाई आणि हा हिंसाचार थांबविण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, कोर्टाने सुनावणी घेतली मात्र कारवाई थांबविण्याबाबत याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा दिला नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे.