गेमिंग झोनमधील सध्याच्या तरुणाईमधील प्रसिद्ध गेम पबजीचे (PUBG) लाखो युजर्स आहेत. मात्र पबजी गेमचा अतिवापर करणे काहींना महागत पडले असून जीव गमवावा लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यात अजून एक भर पडली असून पबजी गेम खेळण्यासाठी नवा मोबाईल खरेदी करुन न दिल्याने विष प्राशन केल्याच प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.
बुंदेलखंड येथे पबजी गेम खेळण्यासाठी विद्यार्थ्याला नवा मोबाईल हवा होता. मात्र त्याला नवीन मोबाईल खरेदी करुन देण्यासाठी घरातील मंडळींनी नकार दिल्याने त्याचा राग मनात धरुन ठेवला. त्यानंतर आत्महत्या करण्यासाठी त्याने विष प्राशन केले. विद्यार्थ्याच्या आईने याबाबत अधिक माहिती देत असे सांगितले की, त्याच्याकडे आधीच दोन मोबाईल आहेत. मात्र तिसरा मोबाईल घेऊन द्यावा अशी मागणी घरातल्यांकडे करत होता. मात्र त्याचा हट्ट पुरवणार नसल्याचे सांगितल्याने वाद सुद्धा झाले. त्यानंतर विद्यार्थ्याने त्याच्या खोलीत जाऊ विष प्यायला.
डॉक्टरांच्या मते पबजी गेम खेळल्यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन बिघडचत चालल्याचे दिसून येत आहे. तसेच यापूर्वी सुद्धा पबजी गेम खेळू न दिल्याने एका महाविद्यालयातील विद्यार्थ्याने त्याच्या वडिलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.(PUBG Game खेळताना तलावात पडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू, वसई येथील घटना)
तसेच काही महिन्यांपूर्वी या व्यक्तीने आपल्या प्रेग्नेंट पत्नीला सोडून दिले. याचे कारण म्हणजे त्याला पबजी खेळण्यासाठी अधिक वेळ हवा होता. या बेजबाबदार व्यक्तीच्या कारनाम्यांचा खुलासा एका फेसबुक पोस्टद्वारे करण्यात आला आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र या पोस्टमध्ये त्या व्यक्तीबद्दल अधिक काही माहिती देण्यात आलेली नाही.