Uttar Pradesh Shocker: इयत्ता 10 वीच्या वर्गात वाद, विद्यार्थ्याने वर्गमित्राला पेट्रोल टाकून जाळले
विद्यार्थ्याने वर्गमित्राला जाळले | (Photo credit: archived, edited, representative image)

Student Burns Classmate In Aligarh: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) अलीगढ येथील एका शाळेत इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणचे त्याच्यावर त्याच्या वर्गमित्रावर पेट्रोल टाकून त्याला जाळल्याचा आरोप आहे. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने अशा प्रकारे केलेली कथीत घटना आणि त्याच्यावर दाखल झालेला गुन्हा, यावरुन परिसरात जोरदार खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी घडली. पीडितेसोबत झालेल्या वादामुळे आरोपीने त्याच्या शाळेच्या दप्तराचे नुकसान केले होते. त्यानंतर तो हे कृत्य करुन फरार झाला. पोलीस त्याच्या मागावर आहेत.

जखमी विद्यार्थ्याला एएमयूच्या जेएन मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तो सुमारे 25 टक्के भाजल्याने त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. मुलाच्या पालकांनी सिव्हिल लाइन्स पोलिसात जाऊन तक्रार दिली. पोलिसांनी प्राप्त तक्रारीच्या आधारे आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

ट्विट

घटनेबद्दल माहिती देताना एएमयूचे प्रॉक्टर मोहम्मद वसीम अली यांनी सांगितले की, अलिगड मुस्लिम विद्यापीठाशी संलग्न असलेल्या राजा महेंद्र प्रताप सिंग एएमयू सिटी स्कूलमध्ये मंगळवारी ही घटना घडली. एका विद्यार्थ्याची बॅग दुसऱ्याने फाडल्याने दोन वर्गमित्रांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर ज्या मुलाची बॅग खराब झाली होती, त्याने कॅम्पसमध्ये उभ्या असलेल्या मोटारसायकलमधून पेट्रोल आणले, त्याच्या वर्गमित्रावर ओतले आणि त्याला पेटवून दिले. या घटनेमुळे शाळेच्या आवारात भीतीचे वातावरण निर्माण झाले.