उत्तर प्रदेश: रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्यास 5 वर्षात दुप्पट रक्कम मिळवण्याचे स्वप्न दाखवत शेकडो लोकांना घातला गंडा
fraud | (Photo credit: archived, edited, representative image)

रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्यास दुप्पट रक्कम मिळेल याच्या नावाखाली शेकडो लोकांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडितांनी असा आरोप लावला आहे की, सात वर्ष उलटली तरीही त्यांना ना पैसे आणि ना प्लॉट दिला गेला आहे. शनिवारी पीडित ग्रेटर नोएडाच्या डीसीपी ऑफिसात दाखल झाला. त्यावेळी त्याने आरोपींच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. एडीसीपीने दादरी प्रभारी यांना या प्रकरणा तपास करण्याचे निर्देशन दिले आहेत.(Indian Railways: महिलांच्या सुरक्षेबाबत भारतीय रेल्वेची मोठी घोषणा, गुन्हेगारी घटनांना 'अशा' प्रकारे घालणार आळा; वाचा सविस्तर वृत्त)

नोएडाचे दादरि परिसरात राहणारे सुनील, सीमा, ओमवती आणि शिवानीसह जवळजवळ वीस लोकांहून अधिक पीडित हे ग्रेटर नोएडातील एडीसीपी विशाल पांडे याला भेटले. पीडितांनी एडीसीपी यांना सांगितले की, 2013 मध्ये पाच लोकांनी मिळून एक कंपनी उभारली होती. त्यावेळी त्यांनी रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचे स्वप्न दाखवले. त्यानंतर लोकांना त्यांची रक्कम दुप्पट होईल आणि प्लॉट सुद्धा दिला जाईल असे आमीष दाखवले.(Madhya Pradesh: घरात घुसून बलात्कार करणाऱ्या नराधमाचे पीडित महिलेने विळ्याने कापले गुप्तांग) 

योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला हजार रुपये आरोपींच्या खात्यात जमा केले जात होते. त्यावेळी आरोपींनी असे आमीष दाखवले की, पाच वर्षानंतर तुमचे पैसे दुप्पट किंवा प्लॉट घेऊ शकता. परंतु आता सात वर्ष उलटली तरीही अद्याप पैसे आणि प्लॉट मिळालेला नाही. यामध्ये एका महिलेचा सुद्धा समावेश आहे. आरोपींनी शंभरहून अधिक जणांना गंडा घातला आहे.