Hapur: Over 12 children were admitted to hospital last night (Photo Credits-ANI)

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) येथे शिवरात्रीच्या निमित्ताने प्रसाद म्हणून दूध देण्यात आले. परंतु हे दुध मुलांनी प्यायल्याने 12 जणांची प्रकृती बिघडली आहे. यामुळे आजारी पडलेल्या मुलांच्या पालकांनी दूधात भांग मिसळी असल्याचा आरोप लागावला आहे.

एनआयने दिलेल्या वृत्तानुसार, हा प्रकार मंगळवारी रात्री घडला असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रसादात दिलेले दूध प्यायल्याने मुलांची तब्येत बिघडली. यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर आता 12 मुलांची तब्येत ठिक असल्याचे सांगण्यात येत आहे.(दारुच्या नशेत सापाला चावला माणूस, कुटुंबीयांनी केले मेलेल्या सापावर अंत्यसंस्कार; उत्तर प्रदेश राज्यातील एटा जिल्ह्यात घडली विचित्र घटना)

हापुड येथील पोलिसांनी असे म्हटले आहे की, येथील एका दुर्गा मंदिरात काही पूजा सुरु होती. त्याच दरम्यान दूध प्रसाद म्हणून देण्यात आले होते. दूध प्यायल्यामुळेच मुले आजारी पडली असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.