SP Ousts BJP from PM Narendra Modi’s Bastion Varanasi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बालेकिल्ल्यात समाजवादी पक्षाची मुसंडी; भाजपचा धक्कादायक पराभव, 10 वर्षांमध्ये पहिल्यांदाच घडले असे
PM Narendra Modi | (Photo Credits: ANI)

भारतीय जनता पक्षाचा प्रमुख आणि सर्वोच्च चेहरा असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांच्या मतदारसंघातच पक्षाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.गेल्या 10 वर्षांमध्ये पहिल्यांदाच भाजपवर ही वेळ आली आहे. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानपरिषद निवडणूक 2020 (Uttar Pradesh Legislative Council Elections 20200) नुकतीच पार पडली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रतिनिधित्व करत असलेल्या वाराणसी येथे भाजप उमदेवारांचा पराभव झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पर्यायाने भारतीय जनता पक्षाच्या बालेकिल्ल्यात समाजवादी पक्ष (Samajwadi Party) मुसंडी मारताना दिसला. या ठिकाणी भाजप दोन जागांवर पराभूत झाला आहे. दरम्यान, इतर दोन जागांपैकी अग्रा येथून भाजपचे

महाराष्ट्रात विधानपरिषदेसाठी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक नुकतीच पार पडली. यात भाजपचा अत्यंत नामुष्कीजनक पराभव झाला. त्याच प्रमाणे उत्तर प्रदेशमध्येही निवडणुका पार पडल्या. येथेही शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात भाजपचा धक्कादायक पराभव झाला. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघात भाजपचा पराभव झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (हेही वाचा, Maharashtra MLC Election 2020 Results: भाजपला पुन्हा सुतक, चंद्रकांत पाटील यांची खुमखुमी चांगलीच जिरली- शिवसेना )

उत्तर प्रदेश विधान परिषद निवडणुकीत दोन जागांवर भाजप आणि समाजवादी पक्षाने उमेदवार उतरवले होते. या दोन्ही जागांवर समाजवादी पक्षाचा विजय झाला. वाराणसी मतदारसंघात समाजवादी पक्षाचे अशुतोष सिन्हा विजयी झाले. तर शिक्षक मतदारसंघातून याच पक्षाचे लाल बिहारी विजयी झाले. इतर दोन ठिकाणी भाजप उमेदवार विजयी झाले. दरम्यान, एकूण जागांपैकी दोन जागांवर भाजप आणि दोन जागांवर समाजवादी पक्ष विजयी झाला आहे. परंतू, वाराणसी येथून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेवर प्रतिनिधित्व करतात. त्यांच्याच मतदारसंघात पक्षाचा पराभव होणे हे आश्चर्यकारक मानले जात आहे.