Husband Wife News: मिठीत घेऊन ओढला चाप,  बंदुकीची एकच गोळी शरीरातून आरपार, दोघांचा मृत्यू;  मोबाईल ठरला कारण, घ्या जाणून
Husband Wife | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

माणसापेक्षा वस्तू अधिक महत्त्वाच्या झाल्या की नाते आणि जोडीदाराचे अवमुल्यन झालेच म्हणून समजता. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मोरादाबाद (Moradabad) येथून अशीच काहीशी घटना पुढे आली आहे. मोबाईल हरविल्याच्या रागातून पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. हे भांडण इतके विकोपाला गेले की, प्रकरण गोळीबारापर्यंत पोहोचले. ज्यात दोघांचाही मृत्यू झाला आहे. नवराबायकोच्याया भांडणाचा शेवट दोघांच्याही मृत्यूने झाला खरा. पण त्यामुळे त्यांची 4 मुले हाकनाक अनाथ झाली. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा आहे.

मोबाईल हरवल्याच निमित्त

मुरादाबाद येथील बिलारी ठाणा हद्दीत असलेल्या खानापूर गावात अनेक पाल आपली पत्नी सुमन आणि तिच्या चार मुलांसह राहत होता. अनेक पाल आणि पत्नी सुमन हे मोलमजूरी करुन पोट भरतात. आपला चरितार्थ चावलतात. दरम्यान, हे कुटुंब एका विवाहासाठी गेले. विवाहाला जमलेल्या गर्दीत त्यांचा फोन कुठेतरी हरवला. ज्यावरुन पती आणि पत्नीमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, प्रकरण हातघाईवर आले. दोघांमध्ये मोठ्या प्रमाणावर हाणामारी झाली. (हेही वाचा, Lesbian Partner Detained By Parents Case: लेस्बियन पार्टनरला कुटुंबीयांनी जबरदस्तीने केले विलग, तरुणीची हायकोर्टात याचिका)

मिठीत घेऊन चाप ओढला

दरम्यान, अनेक पालइतका चिडला की त्याचा राग शांतच झाला नव्हता. त्याने पत्नीला जवळ बोलावले. प्रेमाने जवळ घेतले. तिला मिठी मारली आणि क्षणात काही कळण्याआगोदर हाताली बंदूक तिच्या पाठीवर रोखली आणि खाडकन चाप ओढला. पुढच्या काहीच क्षणात आवाज झाला आणि बंदूकीची गोळी आरपार शिरली. पत्नी सुमन हिच्या शरिरातून बंदुकीची हीच गोळी अनेक पाल याच्याही शरीरातून आरपार गेली. दोघेही जखमी झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडले. मुलांनी गलका केला. गावकरी जमले पण तोवर उशीर झाला होता. दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता. पोलीस आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा आहे.

धक्कादायक असे की, अनेक पाल याने पत्नी सुमन हिच्याशी झालेल्या भांडणानंतर देवपूजा केली. त्यानंतर त्याने पत्नीला जवळ बोलावले आणि तिला मिठीत घेतले. मिठीत घेऊन तिच्या पाठिवर बंदूक रोखली आणि गोळीबार केला. बंदूकीतून सुटलेली गोली सुमनचे शरीर छेदत अनेक पाल याच्याही शरीरात घुसली ज्यात दोघांचा करुन अंत झाला.