Rain | Pixabay.com

उत्तर भारतामध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस हा सुरु आहे. उत्तर प्रदेशात गेल्या तीन दिवसांत पावसाशी संबंधित घटनांमध्ये 34 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी दहा मृत्यू गेल्या 24 तासांत नोंदवले गेले. सरकारी आकडेवारीनुसार, 34 पैकी 17 जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला, 12 जणांचा बुडून मृत्यू झाला आणि अतिवृष्टीमुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनात पाच जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आणि विविध नैसर्गिक आपत्तीत जखमी झालेल्यांना योग्य उपचाराचे आश्वासन दिले. (हेही वाचा -  North India Rain Updates: उत्तर भारतात पावसाचा कहर; 19 जणांचा मृत्यू, शाळा-कॉलेजांना सुट्टी जाहीर)

या पावसाळ्यात उत्तर प्रदेशात आधीच 11 टक्के जास्त पाऊस झाला आहे, ज्यामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे, सखल भागात पूर आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) आकडेवारीनुसार राज्यातील 75 जिल्ह्यांपैकी सुमारे 68 जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे गंगा, रामगंगा, यमुना आणि राप्तीसह राज्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे.