आपल्या मुलाच्या प्रत्येक गोष्टीची आणि आनंदाची काळजी घेणारे वडील मुलाच्या जीवावर उठले तर? विचारही करवत नाही. पण उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) मधून अशीच एक धक्कादायक घटना समोर येत आहे. शुल्लक कारणावरुन एका वडीलांनी आपल्या 3 वर्षांच्या मुलाचा जीव घेतला. रात्री झोपेत मुलाने अंथरुणात सू केल्याने वडीलांनी टोकाचे पाऊल उचलले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून सर्वच अवाक् झाले आहेत. दरम्यान, या प्रकरणी वडीलांना अटक करण्यात आली आहे. (गर्लफ्रेण्डच्या नादात संसार बर्बाद; बापाने चिरला 3 वर्षांच्या मुलीचा गळा, पत्नालाही मारले ठार)
संतराम असे या आरोपीचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील कानपूर मधील घाटमपूर कोतवाली परिसरातील हथेरुआ गावातील रहिवासी आहे. संतराम याच्या 3 वर्षांच्या मुलाने अंथरुणात सू केल्याने त्याला राग अनावर झाला. रागाच्या भरात त्याने मुलाला बेदम मारायला सुरुवात केली. त्यावेळेस त्याची लहान मुलगी आणि पत्नीने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो कोणाचेच ऐकायला तयार नव्हता. त्याने मुलाने उचलून जमिनीवर आपटले आणि त्यात मुलाचा जीव गेला.
या घटनेची वाच्यता कुठेही केल्यास सर्वांचाच जीव घेईल, अशी धमकी त्याने आपल्या पत्नीला दिली. त्यानतंर तो कुटुंबियांसह हमीरपूर येथील छानी गावांत पळून गेला. दरम्यान संतराम च्या पत्नीने आपल्या भावाला फोन करुन या घटनेची माहिती दिली. त्यानंतर भावाने पोलिसांत धाव घेत घडलेली घटना सांगितली. पोलिसांनी आरोपी विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपासही सुरु आहे. (माता ना तू वैरीण! बारामतीत संतापलेल्या आईने पोटच्या मुलीला दगडाने ठेचून केले ठार)
रागाच्या भरात हातातून गुन्हा घडल्याच्या अनेक घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. रागाला कोणतेही नाते दिसत नाही आणि शुल्लक कारणावरुन हत्या, आत्महत्या यांसारखे प्रकार घडतात.