बलात्कार करताना अपयश, आरोपीने अल्पवयीन पीडितेला छतावरुन खाली फेकले
Crime | (Photo credit: archived, edited, representative image)

बलात्कार (Rape) करताना अपयश आले म्हणून आरपीने पीडितेला इमारतीच्या छतावरुन खाली टाकले. उत्तर प्रेशातील (Uttar Pradesh) शाहजहांपूर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. या घटनेत पीडितेला गंभीर दुखापत झाली असून, उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. पीडिता (वय वर्षे 15) ही इयत्ता दहावीची विद्यार्थिनी आहे. पोलीस अधीक्षक दिनेश त्रिपाटी यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, ही घटना कोतवाली शहर परिसरातील बिजली पूरा येथे घडली.

प्राप्त माहतीनुसार आरोपी हा पीडितेच्या घराशेजारी राहतो. पोलीसांनी सांगितले की, पीडितेच्या घराशाजारी राहणारा राजा नामक युवक पीडिता घरात एकटी असताना अचानक घुसला. जबरदस्तीने तिला मिठीत घेऊन त्याने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने त्याला विरोध केला परंतू त्याने जबरदस्ती कायम ठेवत तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. परंतू, पीडितेने मोठ्या निकराने त्याचा विरोध केला. तसेच, आरडाओरडा करत ती घरातून बाहेर पळाली. ती बाहेर पळत असताना आरोपीने तिला पाठीमागे खेचले आणि घराच्या छतावरुन तिला खाली टाकले. (हेही वाचा, बलात्कार करताना व्हिडिओ बनवून पीडितेशी मंदिरात विवाह, हुंड्याच्या नावाखाली 10 लाख रुपयांची मागणी)

पीडितेचा आवाज ऐकून शेजारी जमा झाले. त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. पोलीसांनी सांगितले की, राजा नामक आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, आरोपीचा शोध सुरु आहे. दरम्यान, हरियाणा येथील पलवल येथूनही अशाच प्रकारची घटना पुढे आली होती. येथेही एका तरुणाने अल्पवयीन तरुणीसोबत बलात्कार करुन व्हिडिओ बनवला होता. तसेच, हा व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी देत पीडितेसोबत विवाह केला होता. पुढे त्याने हुंड्यासाठी पीडितेच्या आईवडीलांकडे 10 लाख रुपयांची मागणी केली होती.