बलात्कार करताना व्हिडिओ बनवून पीडितेशी मंदिरात विवाह, हुंड्याच्या नावाखाली 10 लाख रुपयांची मागणी
MMS | (Photo credit: archived, edited, representative image)

बेशुद्धावस्थेत असलेल्या तरुणीवर बलात्कार (Rape) करुन या घाणेरड्या प्रकाराच MMS बनवला. त्यानंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडितेसोबत विवाह केला. इतकेच नव्हे तर, पुढे हुंड्याच्या नावाखाली थेट 10 लाख रुपयांची मागणी पीडितेच्या वडिलांकडे करण्याचा निर्लज्जपणा एका तरुणाने केला आहे. तरुणाच्या या विकृतीविरद्ध पीडिता आणि तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. ही घटना हरियाणा (Haryana) राज्यातील एका जिल्ह्यात घडली. पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली आहे. अद्याप कोणालाही अटक झाली नाही. पोलीसांनी पीडितेला नोएडा (Noida) येथील शेल्टर होममध्ये दाखल केले आहे.

पोलीस ठाण्याच्या प्रमुख एएसआय अंजू देवी यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, तक्रार करणारी पीडिता ही 22 वर्षांची आहे. जीबीटीचे शिक्षण घेत असताना तिची ओळख धीरज नावाच्या एका तरुणासोबत झाली. हा तरुण रेवाडी जिल्ह्यातील शाहपूर भांवल गवाचा राहणारा आहे. दोघांमध्ये मैत्री झाली. दरम्यान, एके दिवशी धिरजने शीतपेयातून (Cold drinks) पीडितेला नशीले पदार्थ पाजले. नशेच्या अंमलाखाली जाऊन ती बेशुद्ध होताच त्याने तिच्यावर बलात्कार केला. बलात्कार करत असताना त्याने व्हिडिओही बनवला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने तिच्यासोबत एका मंदिरात विवाह केला. विवाह केल्यानंतरही आरोपीने पीडितेचा छळ सुरुच ठेवला. तसेच, तिच्यावर वारंवार बलात्कार केला. (हेही वाचा, पालघर: लॉजवरील खोलीत कोंडून एक्स गर्लफ्रेंडवर रात्रभर बलात्कार; प्रियकराला अटक)

विवाहनंतर धीरजने (आरोपी) पीडितेचा छळ ठेवत तिच्या आईवडीलांनाही त्रास देण्यास सुरुवात केली. त्याने हुंड्याच्या नावाखाली 10 लाख रुपयांची रक्कम पीडितेच्या आईवडीलांना मागितली. तसेच, ही रक्कम दिली नाही तर पीडितेवर केलेल्या बलात्काराचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिली. सुरुवातीला पीडिता आणि तिच्या आईवडीलांनी आरोपीला विनंती केली. परंतू, अनेक विनवण्या करुनही आरोपीकडून ब्लॅकमेलींग सुरुच होते. त्यामुळे त्याच्या त्रासाला कंटाळून पीडितेने  पोलिसांमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, पुढील तपास सुरु केला आहे. आरोपीला लवरच अटक केली जाईल असे पोलिसांनी म्हटले आहे.