उत्तर प्रदेश: विषारी दारु प्यायल्याने 14 जणांचा मृत्यू, 12 अधिकारी निलंबित
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-Twitter)

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील बारबांकी जिल्ह्यात विषारी दारु प्यायल्याने 14 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून 12 अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. विषारी दारु प्यायल्याने विषबाधा झालेल्या अन्य जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची कसून चौकशी करण्यात यावी असे आदेश दिले आहेत.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री राणीगंज आणि बाजूच्या गावातील लोकांनी रामनगर येथील एका दुकातून दारु विकत घेतली. मात्र मंगळवारी सकाळी हे सर्वजण आजारी पडल्याने त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र विषारी दारु प्यायल्याने मृतांचा आकडा 16 वर जाऊन पोहचला आहे.(उत्तर प्रदेश मध्ये बनावटी दारूमुळे एकाच कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू, पोलीस करणार कसून चौकशी)

तर या प्रकरणी मुख्य आरोपी पप्पू जैयस्वाल याला अटक करण्यात आली आहे. तसेच 48 तासांच्या अगोदर चौकशीचा अहवाल मागवण्यात आला आहे. दरम्यान मृत व्यक्तींच्या परिवाराला 2 लाख रुपये मुख्यमंत्र्यांकडून दिले जाणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.