उत्तर प्रदेश मध्ये बनावटी दारूमुळे एकाच कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू, पोलीस करणार कसून चौकशी
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-PTI)

उत्तर प्रदेश  (Uttar Pradesh) मधील बाराबंकी (Barabanki)  शहरात बनावटी दारूच्या सेवनाने एकाच कुटुंबातील आठ जणांचा धक्कादायक मृत्यू झाल्याचे समजत आहे. सूत्रांच्या आधारे मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार हे आठ जण एकाच कुटुंबातील सदस्य असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर ही नकली दारू सेवन केलेल्यांना तातडीने हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांच्या संबंधित दारू बनवणाऱ्या पुरवणाऱ्या व विकणाऱ्या मंडळींची चौकशी करायला सुरवात केली आहे.

ही घटना रामनगर हद्दीतील राणीगंज नामक विभागात घडली होती, सोमवारी या आठ जणांपैकी काहींना अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तर काही जणांचा त्याआधी घरीच मृत्यू झाला होता.याशिवाय गावातील अन्य तीन जणांना देखील अचानक हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार जेवणानंतर या आठ जणांनी दारूचे सेवन केले होते त्यामुळे सुरवातीला जेवणातुन विषबाधा झाल्याचा संशय पोलिसांना येत होता मात्र केवळ दारू प्यायलेल्यांनाच हा त्रास होऊ लागल्याने हा संशय फोल ठरू शकतो. तूर्तास मृतांपैकी एकाचा मृतदेह हा पोस्टमार्टम चाचणीसाठी पाठवण्यात आला आहे त्याची पडताळणी होताच मृत्यू मागील नेमके कारण स्पष्ट होईल. पुणे येथील 'बर्गर किंग'च्या बर्गरमध्ये सापडल्या काचा, अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल 

यापूर्वी देखील फेब्रुवारी मध्ये अशाच पराकारची घटना उत्तर प्रदेशात घडली होती ज्यामध्ये तब्बल 97 जणांचा नकली दारू प्यायल्याने मृत्यू झाला होता. यानंतर अवघ्या चारच महिन्यात या घटनेची पुनरावृत्ती झाल्याने दारू निर्माते, विक्रेत्यांची कसून चौकशी करण्यात येणार आहे.