मेरठ: एका व्यक्तीने 50 लाख रुपयांच्या विम्याची रक्कम स्वत:ला मिळावी म्हणून चक्क डॉक्टरांसोबत कट रचून आपल्या बायकोची हत्या केली आहे. महिलेला प्रथम झोपेच्या गोळ्या दिल्या गेल्या आणि त्यानंतर तिला गळा दाबून तिची हत्या केली. ऐवढेच नाही तर महिलेचा मृतदेह फ्रीजर मध्ये ठेवला. पीडित शिक्षिक महिलेची हत्या केल्यामुळे आता ते दोघे कायद्याच्या कचाट्यात अडकले गेले आहेत. तसेच महिलेचा हत्येचा एक फोटो सुद्धा समोर आला असून पोलिसांच्या मते ही घटना फेब्रुवारी, 20 रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे.
संजय लूथरा नावाच्या एका व्यापाऱ्याने आपली बायको चंदा हिची हत्या करण्याचा कट रचला होता. बायकोची हत्या करण्यासाठी त्याने रजत भारद्वाज नावाच्या एका डॉक्टर सोबत हातमिळवणी केली होती.ज्याने लूथरा कडून 1.35 लाख रुपये घेतले होते.(Madya Pradesh Rape: धक्कादायक! मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एका महिलेवर धावत्या कारमध्ये बलात्कार)
लूथरा याने एक अट ठेवली होती की, जर भारद्वाजने त्याच्या बायकोची हत्या केल्यास तो त्याच्याकडून उधारीचे पैसे घेणार नाही. गु्न्हे शाखेचे अधिकारी राम संजीवन यांची टीम जी तपास करत होती त्यांनी म्हटले की, दरम्यान आम्हाला नौचंदी स्थानकातून क्लिन चीट मिळाली होती पण आम्ही तपास सुरुच ठेवला. संजय लूथराचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून त्यामधील डिलिट करण्यात आलेले फोटो सुद्धा परत मिळवण्यात आले. यामधील एक फोटो त्यात महिलेची हत्या केली जात असल्याचे दिसून आले. चौकशीवेशी कळले की, लूथरा यानेच भारद्वाज याचा हा फोटो काढला होता. परंतु नंतर डॉक्टरच्या सांगण्यावरुन तो त्याने डिलिट केला होते. याच दरम्यान चंदा हिचा परिवाला संशय आला.
तिची आई सुनीता देवी यांनी असे म्हटले की, संजय हा चंदा पासून नाते तोडण्यासाठी प्रयत्न करत होता. यासाठी त्याने घटस्फोट देण्याचा सुद्धा मार्ग शोधला. परंतु चंदा हिने त्याला घटस्फोट देण्यास तयार नव्हती. शनिवारी रात्री 11 वाजता ती आपल्या एका नातेवाईकांकडे गेली असता त्याच वेळी तिची हत्या केली गेली. आम्ही नौचंदी पोलिसांना समजवून सांगण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्यांनी कोणतीच कारवाई केली नाही. पण शवविच्छेदनाचे रिपोर्ट्स समोर आल्यानंतर सर्वकाही स्पष्ट झाले.