उत्तर प्रदेशातील कानपूरमधून (Kanpur) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे उच्च प्राथमिक शाळेत पाचवीच्या विद्यार्थ्याला दोनचा पाढा न आल्याने शिक्षकाने त्याला अमानवीय शिक्षा केली आहे. मुलाच्या कुटुंबियांचा आरोप आहे की, मुलाने दोनचा पाढा न वाचल्याने संस्थेच्या प्रशिक्षकाने मुलाच्या हातावर ड्रिल (Drill) मशीन चालवून त्याला जखमी केले. शुक्रवारी नातेवाईकांनी शाळेत एकच गोंधळ घातला. या घटनेची माहिती बीएसएला मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून प्रकरणाची चौकशी केली.
प्रशिक्षकाला तत्काळ प्रभावाने काढून टाकण्यात आले आहे. अनुज असे शिक्षकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विबान हा सीसामऊ पोलीस स्टेशन हद्दीतील मॉडेल प्रेमनगर या प्राथमिक शाळेत इयत्ता 5वीत शिकणारा विद्यार्थी आहे. विबान गुरुवारी शाळेत गेला त्यावेळी त्याला शिक्षकाने दोनचा पाढा म्हणण्यास म्हणण्यास सांगितले, परंतु मुलाला पाढा वाचता आला नाही. त्यानंतर संतापलेल्या शिक्षकाने हातावर ड्रिल मशीन चालवून मुलाला जखमी केले.
मुलाच्या हातावर चालवली ड्रिल मशीन-
#Kanpur में प्राइमरी स्कूल के एक शिक्षक ने 2 का पहाड़ा न सुनाने पर बच्चे पर ड्रिल मशीन चलाने की कोशिश की, लेकिन बच्चे की चीख पुकार सुन एक छात्र ने स्विच को ऑफ कर दिया।
मामले की जानकारी मिलते ही बीएसए और खंड अधिकारी मौके पर पहुंचे। #School के बच्चों में दहशत का माहौल। pic.twitter.com/Dgqm5hvbbd
— UP Tak (@UPTakOfficial) November 25, 2022
मुलाच्या हातातून रक्त निघू लागल्यावर वर्गात एकच खळबळ उडाली. मुलावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला घरी पाठवण्यात आले. बेसिक एज्युकेशन कौन्सिल एम्प्लॉईज युनियनचे विभागीय अध्यक्ष परवेज आलम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलासोबत झालेल्या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सांगितले की, गुरुवारी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष यादव रजेवर होते व सहायक शिक्षिकेच्या हातात चार्ज होता. (हेही वाचा: MP Acid Attack: हळदीच्या कार्यक्रमात पाणी समजून उचलली अॅसिडची बाटली, हवेत उडवताच दोन बहिणी गंभीररित्या भाजल्या)
शाळेत बीएसए सुरजित कुमार यांच्या परवानगीने कौशल्य विकास योजनेंतर्गत मुलांना विविध प्रकारचे शिक्षण दिले जाते, त्याचसाठी ड्रिल मशीन ठेवण्यात आले होते. आलम यांचा शिक्षकांशी संवाद झाल्यानंतर त्यांना समजले की, मुलाला दोनचा पाढा ऐकवला जात होता, मात्र त्याचे लक्ष नव्हते. त्यामुळे त्याला घाबरवण्याच्या उद्देशाने मशीन सुरू करण्यात आल्याची शक्यता आहे, परंतु मशीनमुळे मुलगा जखमी झाला.
त्यांनी सांगितले की, हे अत्यंत धोकादायक आहे, अशा संस्थेने तात्काळ शाळेतून या शिक्षकाला काढून टाकावे. दुसरीकडे, अजूनतरी नातेवाइकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली नाही. शाळेत शिक्षण होत नसल्याचे मुलाच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मुलगा इयत्ता पाचवीतला विद्यार्थी असून त्याला अजूनही पाढे येत नाहीत. याला शाळेतील शिक्षक जबाबदार आहेत.