UP: बक्षीस घेण्यासाठी बारबाला स्टेजवरुन खाली न उतरल्याने तिच्यावर झाडली गोळी
बारबाला (संग्रहिचित्र)

युपी मधील शाहजहांपुर मधील मिर्जापूर ठाणा क्षेत्रात स्टेजवर डान्स करणाऱ्या बार बालावर गावातील दबंगांनी गोळीबार केला. ज्यामध्ये दोन जणी बचावल्या गेल्या पण त्यांचा साथीदार गंभीर रुपात जखमी झाला आहे. स्टेजवर नाचत असलेल्या बारबालाला खाली येऊन बक्षीस घेण्यासाठी बोलावले गेले. पण ती खाली न गेल्याने दबंगांनी गोळीबार केला. प्रदीप कुशवाह याच्या मुलाचा बारसा होता. सोहळा झाल्यानंतर लोकांच्या मनोरंजनासाठी बारबालांनी डान्स सुरु केला. बारबालांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती.(Bank of Baroda: मास्क घातला नाही म्हणून ग्राहकाला झाडली गोळी, बॅंक ऑफ बडोदाच्या सुरक्षा रक्षकाला अटक)

बारबालाला डान्स करताना पाहत असताना यादव याने तिच्यावर खुश होऊन तिला स्टेजवरुन खाली येऊन बक्षीस घेण्यास बोलावले. पण तिने त्यासाठी नकार दिला. त्याचवेळी यादव हा संतप्त झाला आणि बंदुक काढत बारबालावर गोळीबार केला. बंदुकीतून निघालेल्या गोळीतून बारबाला बचावल्या गेल्या. गोळीबारामुळे खळबळ उडाली आणि यादव याला पोलिसांनी ताब्यात घेतले.(Delhi Murder: दारूची तलब भागवण्यासाठी 45 वर्षीय व्यक्तीची केली हत्या, दिल्ली येथील 3 अल्पवयीन मुलांना अटक)

अप्पर पोलीस अधिक्षक संजीव कुमार बाजपेयी यांनी असे सांगितले की, पृथ्वीपुर गावात कार्यक्रमादरम्यान बारबला नाचत होत्या. त्याचवेळी गावातील यादव याने तिच्यावर गोळीबार केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गोळीबार केल्याने पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत त्याची तुरुंगात रवानगी केली आहे.