टॅक्स मध्ये कुठलाही बदल नाही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून देण्यात आलेला नाही. यामध्ये नव्या टॅक्स रिजीम् नुसार 7 लाखापर्यंतच नागरिकांना कर द्यावा लागणार नाही.
Union Budget 2024-25 Highlights: टॅक्स स्लॅब मध्ये कुठलाही बदल नाही - निर्मला सीतारमण
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) आज (1 फेब्रुवारी) मोदी सरकारच्या दुसर्या टर्म मधील शेवटचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. हा अर्थसंकल्प आगामी लोकसभा निवडणूकांच्या वर्षातील असल्याने पूर्ण नसून अंतरिम अर्थसंकल्प आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पामध्ये काही लोकप्रिय घोषणा होऊ शकतात. त्यामुळे सर्वसामान्यांचे या बजेट कडे विशेष लक्ष आहे. आज सकाळी 11 वाजता अर्थमंत्री लोकसभेत अर्थसंकल्प मांडणार आहेत. काल अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी हे बजेट नारी शक्तीला समर्पित असल्याची भावना बोलून दाखवली आहे. तसेच निवडणूकीनंतर आपण पूर्ण बजेटही सादर करू असा विश्वास वर्तवला आहे.
निर्मला सीतारमण यांच्यासाठी यंदाचा अर्थसंकल्प खास आहे. हा त्यांचा सलग सहावा अर्थसंकल्प असणार आहे. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून त्या पी चिदमबरम, डॉ. मनमोहन सिंह, यशवंत सिन्हा, अरूण जेटली यांचा रेकॉर्ड मोडीत काढणार आहेत. नक्की वाचा: President Droupadi Murmu's Speech Today: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान भाषण, जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे (Watch Video).
दरम्यान आजचा अर्थसंकल्प हा अंतरिम असल्याने सरकारला तात्पुरत्या आर्थिक व्यवहारांसाठी लागणार्या रक्कमेचा यामध्ये लेखाजोखा मांडला जातो. त्यामुळे काल बजेट पूर्वी आर्थिक सर्वेक्षण देखील जाहीर करण्यात आलेले नाही. परंतू या बजेट मध्ये ग्रीन एनर्जी, शेतकरी आणि कष्टकरी समाजासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या जाऊ शकतात. देशाला जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचं उद्दिष्ट पंतप्रधान मोदी यांनी ठेवलं असल्याने त्या दृष्टीने उद्योगाला चालना देण्यसाठी काही घोषणा होणार का? हे पाहणं गरजेचे आहे. मात्र हे अंतरिम बजेट असल्याने कोणत्याही नव्या योजना सुरू केल्या जाणार नाहीत.