President Droupadi Murmu's Speech Today: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान भाषण, जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे (Watch Video)
Droupadi Murmu (Photo Credit - ANI/X)

नवनिर्मित संसद भवनात अर्थसंकल्पीय अधिवेशन 2024 (Budget 2024) सुरू होताच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी राष्ट्र आणि संसद सदस्यांना आज (31 जानेवारी) संबोधीत केले. संसदेत प्रवेश करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही देशाला आपला संदेश दिला. राष्ट्रपतींनी आपल्या भाषणामध्ये विद्यमान केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली केलेल्या विकासकामांचा आणि केलेल्या प्रगतीचा आढवा घेतला. त्यांनी आपल्या देशाच्या महान परंपरा आणि सांस्कृतिक वारषाचा मोठ्या अभिमानाने गौरव केला. त्यांच्या भाषणाती काही महत्त्वाचे मुद्दे खालील प्रमाणे.

राष्ट्रपतींच्या भाषणात चंद्राचे कौतुक

आपल्या भाषणात, राष्ट्रपती मुर्मू यांनी भारताच्या अलीकडील कामगिरीचे कौतुक केले, चांद्र मोहीम, संरक्षण दलाच्या प्रमुखाची नियुक्ती आणि राम मंदिराचे बांधकाम यासारख्या महत्त्वाच्या घटनांवर त्यांनी अधिक भर दिला. भारताच्या एकात्मतेचा आणि लोकशाही तत्त्वांप्रती वचनबद्धतेचा पुरावा म्हणून नवीन संसद भवनाचे प्रतीकात्मक महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. नव्या सभागृहात ठोस धोरणात्मक चर्चेसाठी त्यांनी आपला आशावाद व्यक्त केला. (हेही वाचा, Import Duty On Mobile Phone Slashed: मोबाईल फोन स्वस्त होणार, केंद्र सरकारकडून आयात शुल्कात पाच टक्क्यांची घट)

'मोठ्या प्रमाणावर गरिबी दूर होताना दिसत आहे'

आज आपण जे यश पाहतो ते गेल्या 10 वर्षांच्या पद्धतींचा विस्तार आहे. 'गरीबी हटाओ'चा नारा आम्ही लहानपणापासून ऐकत होतो. आज आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर गरिबी दूर होताना दिसत आहे, असेही राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले, 'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत' ही आमची ताकद बनली आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. संरक्षण उत्पादनाने १ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडल्याचेही राष्ट्रपतींनी कौतुक केले.

व्हिडिओ

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी संसदेच्या पायऱ्यांवरून देशाला संबोधित करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या आगामी बजेट सादरीकरणावर प्रकाश टाकला. त्यांनी भारताच्या प्रगती आणि सर्वसमावेशक विकासाच्या मार्गावर विश्वास व्यक्त केला आणि देशाच्या नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्टतेच्या अथक प्रयत्नांची पुष्टी केली.

31 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2024 या कालावधीत होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला निवडणुकीच्या वर्षापूर्वी विशेष महत्त्व आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन तीन महिन्यांच्या कालावधीसाठी अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील, ज्यामध्ये 2024-2025 या आर्थिक वर्षासाठी निवडणुकीनंतरच्या चर्चेसाठी पूर्ण अर्थसंकल्प असेल.

व्हिडिओ

अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने झाली. ज्यात गंभीर आर्थिक आणि धोरणात्मक बाबींवर संसदीय चर्चा सुरू होईल. देश या विधायी प्रवासाला सुरुवात करत असताना, आगामी अर्थसंकल्प सादरीकरणामध्ये नमूद केलेल्या आर्थिक प्राधान्यक्रम आणि विकासात्मक कार्यक्रमांबाबत अपेक्षा वाढत आहेत. आजपासून सुरु होत असलेलेल संसदीय अधिवेशन येत्या नऊ फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात पुन्हा एक नवा संघर्ष पहायला मिळणार का? याबाबत उत्सुकता आहे.