Budget 2019 Highlights: बजेटमध्ये कोणत्या गोष्टी झाल्या स्वस्त आणि महाग, पाहा संपूर्ण यादी
Union Budget 2019 (File Photo)

अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी मोदी सरकारच्या (Modi Government)  दुसऱ्या पर्वातील पहिले बजेट (Budget 2019)  आज (5 जुलै) लोकसभेत सादर केले. तर पुढील वर्षभरासाठी सीतारमण यांनी अर्थसंकल्पानुसार विविध विभागातील गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्याचसोबत अर्थव्यवस्थेला गतीनान बनवणे आणि आर्थि सुधारणांना वेग देण्यासाठी अर्थसंकल्पात महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या. अर्थव्यवस्था अधिक मजबूत बनवण्यासाठी मोदी सरकारने दिलेली आश्वासने लवकरच पूर्ण होणार असल्याचे धोरण त्यांच्या समोर असणार आहे.

2019-20 साठी देशाचा आर्थिक विकास दर (GDP) 7 टक्के असू शकतो. असे आर्थिक सर्वेक्षणामध्ये सांगण्यात आले आहे. आर्थिक सर्वेत परदेशी गुंतवणूक वाढणार आहे. तर महाराष्ट्रात आगामी काही महिन्यातच विधानसभा निवडणूका असल्याने आता शेतकरी, पाणीसंकट, सामान्य नोकरदार आणि उद्योजकांसाठी खास योजना जाहीर करण्यात आल्या असून करदात्यांना सवलत मिळाली आहे. तर पाहा अर्थसंकल्पानुसार कोणत्या गोष्टी महागल्या आणि कोणत्या गोष्टी स्वस्त झाल्या ते पाहा.

>>या गोष्टी महाग होणार:

पेट्रोल-डिझेल, सोने, काजू या गोष्टी महाग होणार आहेत. तसेच आयात शुल्कात नफा होण्यासाठी काही गोष्टींचे दर वाढवण्यात येणार आहेत. आयात केलेल्या पुस्तकांवर पाच टक्के अतिरिक्त शुल्क आकारला जाणार आहे. वाहानाचे पार्ट्स, सिंथेटिक रबर, पीवीसी, टाइल्स सुद्धा महागणार आहेत. तंबाकू उत्पादनसुद्धा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर महागणार आहे. त्याचसोबत सोने-चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांना अतिरिक्त शुल्क मोजावे लागणार आहेत.

>या गोष्टी झाल्या स्वस्त

अर्थसंकल्प 2019 सादर केल्यानंतर इलेक्ट्रिक कार खरेदी करणे स्वस्त होणार आहे. मात्र इलेक्ट्रिक कार उद्याप जास्त प्रमाणात उपयोग केला जात नसला तरीही त्यांच्या किंमती कमी ठेवण्यात येणार आहेत. होम लोन स्वस्त होणार असून त्यासाठी व्याजावर 3.5 लाख रुपयापर्यंत सुट मिळणार आहे.

(Budget 2019: निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पातील 159 वर्ष जूनी परंपरा मोडली, लेदर बॅग ऐवजी लाल कपड्यातून आणली कागदपत्रं; आर्थिक सल्लागार के. सुब्रम्हणम यांनी केला 'खास' खुलासा)

निर्मला सीतारमण मोदी सरकारमध्ये आधी संरक्षणमंत्री होत्या आणि आता नव्या सरकारमध्ये अर्थमंत्री पद सांभाळत आहेत त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे लक्ष लागून राहिले आहे. लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प मांडणार्‍या निर्मला सीतारमण या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत.