बसपा आमदार राजू पाल हत्या प्रकरणातील आरोपी अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ खालिद अझीम उर्फ अश्रफ (Khalid Azim alias Ashra) याच्याह इतर काही जण दोषी ठरले आहेत. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील प्रयागराज (Prayagraj येथील न्यायालयाने हा निकाल दिला. या प्रकरणात दोषींना काय शिक्षा मिळते याबाबत सर्वांचे लक्ष न्यायालयाच्या निकालाकडे लागले आहे. अतिक अहमद हा स्थानिक गुंडगीरीतून पुढे आला होता. नंतर तो राजकारणीही बनला.
बसपा आमदार राजू पाल यांचे सन 2005 मध्ये अपहरण झाले होते. पुढे त्यांची हत्या झाली. हे प्रकरण प्रदीर्घ काळ न्यायप्रविष्ठ होते. तत्कालीन जिल्हा पंचायत सकस्य उमेश पाल यांनी पोलिसांनी दिलेल्या माहितीत सांगितले की, बसपा आमदार राजू पाल यांची 25 जानेवारी 2005 रोजी हत्या झाली आणि तो या हत्येचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे.
उमेश पाल यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत सांगितले की, अतिक अहमद याने राजू पाल यांना राजकारणात माघार घेण्यासाठी दबाव टाकला होता. परंतू, राजकारणात माघार घेण्यास राजू पाल यांनी नकार दिला. त्यानंतर अतिक अहमद , त्याचा भाऊ आणि इतर चार अज्ञात इसमांनी त्याचे.
ट्विट
Uttar Pradesh: Atiq Ahmed, his brother Ashraf held guilty in 2007 Umesh Pal kidnapping case
Read @ANI Story | https://t.co/3KkGwy6FVj#UmeshPalCase #AtiqAhmed #UmeshPalKidnappingCase #UttarPradesh pic.twitter.com/hibEya4Txo
— ANI Digital (@ani_digital) March 28, 2023
उमेश पाल यांनी आरोप केला की, जेव्हा त्याने अहमदच्या दबावाखाली माघार घेण्यास नकार दिला तेव्हा त्याचे बंदुकीच्या जोरावर अपहरण करण्यात आले. या प्रकरणात अहमद, त्याचा भाऊ आणि चार अज्ञात लोकांविरुद्ध 5 जुलै 2007 रोजी एफआयआर नोंदवण्यात आला होता.