
जवळपास वर्षभरानंतर तूरडाळीच्या दरांत (Turdal Price) घसरण झाली आहे. किरकोळ बाजारात तूरडाळ 180 रुपये किलोपर्यंत तर मूगडाळ (Mugdal) आणि इतर डाळीही शंभरीपार पोहोचल्याने सर्वसामान्यांना मोठा झटका बसला होता. किरकोळ बाजारात (Market) तूरडाळीचे दर 20 रुपयांनी कमी झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळत आहे. मागील वर्षभरात तूरडाळीच्या दरात तब्बल 35 ते 40 टक्क्यांपर्यंतची वाढ नोंदविली होती. किरकोळ बाजारात 180 रुपये प्रतिकिलोपर्यंत तूरडाळीचे दर गेले होते. (हेही वाचा - Central Government On Tur Dal: आयात साठा येईपर्यंत तूर डाळीचा ऑनलाईन लिलाव, केंद्र सरकारचा निर्णय)
बाजारात नवीन माल येण्यास सुरुवात झाली आहे. डिसेंबरच्या सुरुवातीपर्यंत तूरडाळीचे दर तेजीत होते. परंतु, आता नवीन मालाची आवक होत असल्याने किरकोळ बाजारात तूरडाळ प्रतिकिलो 20 रुपयांनी स्वस्त झाली आहे. बाजारात तूरडाळीसह मूगडाळही 10 रुपयांनी उतरली आहे. तर चणाडाळ, मसूरडाळीचे दर स्थिर आहेत.
यंदा अपेक्षेच्या तुलनेत पाऊस कमी झाल्याने उडीद डाळीच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे एकीकडे इतर डाळी स्वस्त होत असतानाच किरकोळ बाजारात उडीद डाळ काही प्रमाणात महागली आहे. किरकोळ बाजारात उडीद डाळ दहा रुपयांनी वाढली आहे.