
Haridwar: कर्जाला कंटाळून एका ज्वेलर्स व्यावसायिकाने पत्नीसह हरिद्वारमध्ये गंगा नदीत उडी मारून आत्महत्या केली. उडी मारण्यापूर्वी दोघांनीही सेल्फी काढला. सौरभ बब्बर आणि मोना बब्बर असे मृत जोडप्याचे नाव आहे. पोलिसांना सुसाईड नोटही सापडली आहे. सौरभ बब्बर आणि मोना बब्बर हे दोघेही सहारनपूरमध्ये राहत होते आणि बाईकवरून हरिद्वारला पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ बब्बर याचे सहारनपूरमध्ये श्री साई ज्वेलर्स नावाने दुकान आहे. सोमवारीच हे जोडपे मोटारसायकलवरून हरिद्वारला पोहोचले होते. हे देखील वाचा:Kolkata Rape Murder Case: FAIMA कडून आज देशभर ओपीडी बंद ठेवण्याचा निर्णय; मुंबई मध्ये नायर हॉस्पिटल, नागपूर मध्ये GMCH बाहेर डॉक्टर विद्यार्थ्यांचे आंदोलन
माहिती देताना राणीपूर पोलिस स्टेशनचे प्रभारी विजय सिंह म्हणाले की, जमालपूर खुर्द गावाजवळील गंगा कालव्याच्या काठावर दलदलीत एका व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, गोताखोरांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृताच्या पँटच्या खिशात मोबाईल फोन आणि पर्स सापडली असून त्या आधारे मृतदेहाची ओळख पटू शकल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांनी सांगितले की, मृताच्या पत्नीचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मृत सौरभ यांच्यावर सुमारे 10 कोटी रुपयांचे कर्ज होते. कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याचे त्यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. दोन्ही मुलांनी आजीकडे राहावे, असेही त्यांनी लिहिले आहे. या घटनेनंतर मृताच्या घरावर शोककळा पसरली आहे.