Pythons | (Photo Credit - ANI)

त्रिची विमानतळावर (Trichy International airport) एका प्रवाशाकडून सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी विचित्र गोष्टी जप्त केल्या आहेत. या प्रवाशाच्या बॅगमधून चक्क 47 लहानमोठे साप (Snakes ), अजगर आणि दोन दुर्मीळ प्रजातिचे सरडे (Lizards)असे सरपटणारे प्राणी जप्त केले आहेत. हा प्रवासी क्वलालंपपूरहून (Kuala Lumpur) आला होता अशी प्राथमिक माहिती आहे. मोहम्मद मोईदीन असे या प्रवाशाचे नाव असल्याचे समजते.

मोहम्मद मोईदीन हा बाटिक एअरच्या विमानाने त्रिची विमानतळावर आला. त्याच्या हालचाली संशयास्पद आढळल्याने सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी त्याला रोखले आणि त्याची तपासणी केली. त्याच्याकडे असलेल्या पिश्यांमध्ये काहीतरी वित्रिच गोष्टी असल्याचे जाणवले. पोलिसांनी विशेष तपासणी केली असता त्याच्याकडे असलेल्या बॅगला काही छिद्रे असून त्यात काहीतरी जिवंत असल्याचे आढळले. पोलिसांनी बॅग उघडली असता त्यांना धक्का बसला. कारण आत जवळपास जंगलच होते. ज्यात छोटेमोठे साप, अजगर आणि सरडे होते.

सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी वन विभागाला सदर घटनेबाबत माहिती दिली. वन अधिकाऱ्यांनी विमानतळावर पोहोचताच 47 अजगर आणि दोन सरडे आरोपीकडून जप्त केले. हा प्रवासी मलेशियावरुन आला होता. त्याने हे प्राणी तिकडून आणल्याचे सांगितले. त्यानंतर प्रशासनाने हे सरपटणारे प्राणी पुन्हा मलेशियाला पाठविण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. तर, आरोपीला तपासासाठी ताब्यात घेतले आहे. त्याच्या या कृतीमागे प्राण्यांची तस्करी करणारे आंतरराष्ट्रीय रॅकेट तर नाही ना? याची पोलीस माहिती घेत आहेत.

व्हिडिओ

वन्य प्राण्यांची तस्करी हा पाठिमागील प्रदीर्घ काळापासून मोठा चिंतेचा विषय ठरला आहे. अनेक लोक वेगवेगळ्या कारणांसाठी वन्य प्राण्यांची तस्करी करतात. काही लोक जादूटोणा, काही लोक नशा तर काही लोक इतर काही कारमांसाठी वन्य प्राण्यांच्या तस्करीत गुंतलेले असतात. हे लोक स्थानिक पातळीवर अत्यंत किरकोळ किमतीला प्राणी विकत घेतात किंवा पकडतात. त्यानंतर पुढे ते मोठ्या किमतीला आंतरराष्ट्रीय बाजारात विकतात, असे अनेकदा पुढे आले आहे. आताही आरोपीने कोणत्या कारणास्तव हे प्राणी आणले होते. त्याचा हेतू काय होता याबाबत उत्सुकता आहे.