Train Derailment in Peddapalli: तेलंगणातील पेड्डापल्ली (Peddapalli) जिल्ह्यात मालगाडी रुळावरून घसरल्याने 20 प्रवासी गाड्या रद्द (Goods Train Derail,) कराव्या लागल्या आहेत. दक्षिण मध्य रेल्वे (SCR) अधिकाऱ्यांनी आज बुधवारी 13 नोव्हेंबर रोजी याबाबतची माहिती दिली. SCR अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंगळवारी रात्री उशिरा राघवपुरम आणि रामागुंडम दरम्यान लोहखनिज घेऊन जाणाऱ्या मालगाडीचे 11 डबे रुळावरून घसरले. (Train Derailment Attempt in Prayagraj: प्रयागराजमध्ये वंदे भारतच्या अपघाताचा प्रयत्न? रेल्वेसमोर दुचाकी टाकून तरुणाचा पळ, सुदैवाने दुर्घटना नाही)
मालगाडी गाझियाबादहून काझीपेठला जात होती
तेलंगणातील पेड्डापल्ली येथे मालगाडीच्या 11 बोग्या रुळावरून घसरल्या. त्यामुळे अनेक गाड्यांचे वेळाप्रतक विस्कळीत झाले आहे. गाझियाबादहून काझीपेटकडे लोखंडी कॉइल घेऊन जाणारी मालगाडी पेड्डापल्ली जिल्ह्यातील राघवपूर आणि कन्नाल दरम्यान रुळावरून घसरली आणि अकरा बोगी रुळावरून घसरली. (Train Derailment Bids Rise: भारतात रेल्वे अपघातांच्या प्रयत्नांत वाढ; एकट्या ऑगस्टमध्ये 18 घटना, रेल्वेकडून माहिती उघड)
मुख्य रेल्वे मार्गावर गाड्यांची वाहतूक विस्कळीत
या अपघातामुळे दिल्ली आणि चेन्नईच्या मुख्य रेल्वे मार्गावरील गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली असून दोन्ही बाजूंच्या गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. सुपरफास्ट एक्स्प्रेस गाड्यांबरोबरच एक्स्प्रेस, पॅसेंजर ट्रेन आणि मालगाड्या अनेक ठिकाणी रुळांवर अडकून पडल्या आहेत. मालगाडीच्या बोगी रुळावरून घसरल्याचे समजताच रेल्वे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.
पेड्डापल्ली येथे मालगाडीच्या 11 बोगी रुळावरून घसरल्या
Anxious passengers at #SecunderabadRailwayStation after
cancellation of #JammuTawiExpress, & three other trains that were among #20TrainsCancelled, some trains partially cancelled / diverted after 11 wagons of goods train carrying iron ore #derailed in #Peddapalli dist #Telangana pic.twitter.com/Ksg1r2aVS9
— Uma Sudhir (@umasudhir) November 13, 2024
20 प्रवासी गाड्या रद्द
एससीआर झोनने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की मालगाडी रुळावरून घसरल्यामुळे 20 प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यापैकी चार अंशतः रद्द करण्यात आल्या आणि 10 ट्रेन वळवण्यात आल्या आहेत. याशिवाय दोन गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला असून तीन गाड्या शेवटच्या स्टेशनवर पोहोचण्यापूर्वी थांबवण्यात आल्या आहेत. रुळांची दुरुस्ती आणि रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.