Coronavirus In India | Photo Credits: Pixabay.com

भारतात कोरोनाचा (Coronavirus) अक्षरश: धुमाकूळ घातला असून दिवसभरात कोरोनाचे 5000 हून अधिक रुग्ण आढळून येत आहे. गेल्या 24 तासांता देशात 5242 कोरोना रुग्ण आढळले असून ही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ झालेली रुग्णसंख्या आहे. यामुळे देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 96,169 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 157 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या 3029 इतकी झाली आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात सद्य स्थितीत 56,316 रुग्णांवर उपचार सुरु असून 36,824 रुग्ण बरे झाल्याची माहिती देखील आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

भारतात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात असून राज्यात एकूण 33,053 रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ गुजरातमध्ये 11,379 एकूण रुग्ण आहेत. गुजरात नंतर तमिळनाडू आणि नवी दिल्लीत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. Lockdown 4 Guidelines: केंद्र सरकारने जाहीर केले लॉक डाऊन 4 चे नियम; जाणून घ्या 31 मे पर्यंत Night Curfew सह कोणत्या गोष्टी सुरु असतील व काय असेल बंद, See Full List

कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संक्रमण थांबवण्यासाठी देशात येत्या 31 मार्च पर्यंत लॉकडाऊन (Lockdown) वाढवण्यात आला आहे. सोमवारपासून देशात लॉकडाऊन 4.0 ला सुरुवात होणार आहे. केंद्र सरकारने लॉकडाउन 31 मे पर्यंत वाढवणार असल्याचं जाहीर केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आठवड्यात देशाला संबोधित करताना लॉकडाऊनचा काळावधी वाढवणार असल्याचे सांगितले होते. परंतु, त्यावेळी त्यांनी चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन विषयी सविस्तर माहिती दिली नव्हती. 17 मे रोजी नागरिकांना लॉकडाऊन 4.0 संदर्भात माहिती दिली जाईल, असं स्पष्ट केलं होतं.