चेन्नईमध्ये नुकत्याच घडलेल्या एका घटनेमध्ये सोशल ट्रोलिंगचा परिणाम पीडित महिलेनं थेट आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलण्यात झाल्याचं दिसून आलं आहे. या महिलेच्या लहान मुलाचा एक व्हिडीओ काही आठवड्यांपूर्वी व्हायरल झाला होता. हे मूल वरच्या गॅलरीतून खाली पडल्याची माहिती समोर आली होती. काही स्थानिकांनी मोठ्या हिमतीनं या मुलाला छतावरून वाचवून सुखरूप खाली आणलं होतं. त्यानंतर झालेल्या ट्रोलिंगमुळे महिलेनं आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. (हेही वाचा - Chennai Baby Rescue VIDEO: बाल्कनीच्या छतावर पडलेल्या बाळाला जीवदान, काळजाला भिडणारा व्हिडिओ व्हायरल)
पाहा पोस्ट -
Social media is a juvenile place filled with adults who used to bullies and those who couldn't be, being bullies just the same under anonymity cloak. https://t.co/4i7IV6zVIC
— vijay (@vijaytherock21) May 20, 2024
एकीकडे लहान मुलाला वाचवणाऱ्या स्थानिकांचं कौतुक होत जात असताना दुसरीकडे या मुलाच्या आईवर मोठ्या प्रमाणावर टीका व्हायला लागली होती. आईनं मुलाकडे लक्ष दिलं नाही म्हणून ते मूल गॅलरीतून खालच्या शेडवर पडल्याचे दावे करण्यात येऊ लागले. सोशल मीडियावर या मुलाच्या आईला उद्देशून टीका होऊ लागली. तिनंच हलगर्जीपणा केला असेल, असंही बोललं जाऊ लागलं. मूल वाचल्यामुळे या आईचा जीव भांड्यात पडला असला, तरी या ट्रोलिंगमुळे आईवर प्रचंड मानसिक ताण येऊ लागला. एप्रिल महिन्यात मूल गॅलरीतून पडल्याची घटना घडल्यानंतर ही महिला मुलासह कोईम्बतूरमध्ये आपल्या आई-वडिलांच्या घरी राहायला गेली होती.
या महिलेने तिच्या पालकांच्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. आसपासच्या नागरिकांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. मात्र, तिथे महिलेला मृत घोषित करण्यात आलं. सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगमुळेच या महिलेनं आत्महत्येचं पाऊल उचलल्याची माहिती आता समोर आली आहे.