Chennai Baby Rescue VIDEO: PC TWITTER

Chennai Baby Rescue VIDEO:  चैन्नईतील उच्चभ्रू इमारतीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. चिमुकले बाळ चुकून बाल्कनीच्या छतावर पडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बाळला वाचवण्यासाठी सोसायटीच्या लोकांनी मदतीचा हात दिला आहे. सोसायटीच्या धाडसी लोकांनी अथक प्रयत्नानंतर बाळाला वाचवले आहे. रविवारी २८ एप्रिल रोजी सोशल मीडियावर बाळाला रेस्क्यू केल्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. (हेही वाचा- मुलगा शेजाऱ्याच्या मुलीसोबत पळून गेल्याने आईची हत्या; गुन्हा दाखल)

व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, सोसायटीतील लोकांनी बाळ खाली पडेल या भितीने आधीत एक बेडशीट पसरून उभे होते. त्यानंतर, पहिल्या मजल्याच्या खिडकीतून काही लोकांनी शक्कल लढवत बाळाला वाचवले आहे. एक जण खिडकिच्या बाहेर उभे आहे आणि एक जण खिडकीला लटकून बाळाला छतावरून काढले. बाळाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. मृत्यूच्या तोंडातून बाळाला वाचवल्याने सर्वजण धाडसी लोकांचे कौतुक करत आहे.

बाळ अखेर सुखरुप आहे. सोसायटीतील लोकांना बाळाला वाचवण्यास यश आले आहे. चिमुकलीचे प्राण वाचवल्याबद्दल पालकांनी बचाव करणाऱ्यांचे आभार मानले आहेत. नेटकऱ्यांकडून देखील कौतुक होत आहे. बाळ बाल्कनीच्या छतावर कसे पडले याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. चिमुकली छतावर पडल्यामुळे सोसायटीत गोंधळाची परिस्थीती निर्माण झाली आहे.