Gujarat Shocking: गुजरात (Gujarat) मधून गुन्हेगारीची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मानसा येथील रहिवासी शिल्पा ठाकोर (Shilpa Thakore) यांचा 19 वर्षांचा मुलगा किशन शेजारच्या एका अल्पवयीन मुलीसह पळून गेल्यानंतर तिचा खून करण्यात आला. मुलगी तिच्या कुटुंबाकडे परतली असूनही, मुलगी परतल्यानंतर सात दिवसांनी शुक्रवारी रात्री परिस्थितीने हिंसक वळण घेतले. मानसातील रिधोल गावातील रहिवासी महेश ठाकोर यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचा मुलगा किशन हा त्यांच्या शेजाऱ्याच्या मुलीसोबत पळून गेला होता, जी अल्पवयीन होती. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी 19 एप्रिलला किशनविरुद्ध तक्रार नोंदवली.
तक्रार नोंदवल्यानंतर किशन आणि मुलगी परत आले. त्यानंतर मुलगी तिच्या पालकांच्या घरी परतली. या घटनेनंतर ठाकोर कुटुंब हा परिसर सोडून चरडा येथे नातेवाईकाच्या घरी राहण्यासाठी गेले. मानसा पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री कुटुंब परतल्यावर मुलीचे कुटुंबीय त्यांच्या घरी आले आणि त्यांना मारहाण करू लागले. मुलगी अल्पवयीन असल्याने हल्ला करणाऱ्या कुटुंबाचा तपशील सार्वजनिक करता येणार नाही, असे पोलिसांनी नमूद केले. (हेही वाचा -UP Horror: लग्नासाठी राजी न झाल्याने संतापलेल्या प्रियकराने तरुणीला 3 दिवस ओलीस ठेवून केला बलात्कार, गरम लोखंडी रॉडने केली बेदम मारहाण)
त्यानंतर आरोपींनी फिर्यादीवर काठ्या, तलवारीने हल्ला केला. शिल्पाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिच्यावर हल्ला केला. तक्रारदाराची आई गाजी ठाकोर आणि वडील मोहन यांच्यावरही हल्ला करण्यात आला. आरोपींनी शिल्पावर तलवारीने वार केले आणि नंतर तिला उचलून ठाकोर घराच्या मागून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर फेकून दिले. (हेही वाचा -Uttar Pradesh Shocker: अजब प्रेम की गजब कहाणी, पहिल्याचं नजरेत सासू सोबत जडलं प्रेम, शारिरीक संबंधासाठी सूनेकडून दबाव)
यात शिल्पा यांचा जागीच मृत्यू झाला, तर गाजी आणि मोहनभाई यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. शुक्रवारी रात्रीपासून मुलीचे कुटुंबीय फरार झाले.