UP Horror: लग्नासाठी राजी न झाल्याने संतापलेल्या प्रियकराने तरुणीला 3 दिवस ओलीस ठेवून केला बलात्कार, गरम लोखंडी रॉडने केली बेदम मारहाण
Hostage and rape | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

UP Horror: उत्तर प्रदेशातील लखीमपूर (Lakhimpur) खेरी येथील एका तरुणाची क्रूरता समोर आली आहे. आरोपीने अल्पवयीन मुलीला तीन दिवस ओलीस ठेवून तिच्यावर वारंवार बलात्कार (Rape) केले. तरुणीने आरोपीशी लग्न करण्यास नकार दिल्याने संतापलेल्या तरुणाने हे धक्कादायक कृत्य केलं. आरोपीची क्रूरता इथेच थांबली नाही, त्याने मुलीच्या चेहऱ्यावर आपले नाव लिहिण्यासाठी गरम इस्त्रीने तिला डागले केले. ही घटना धौराहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

पीडितेचे वय 17 वर्षे असल्याचे सांगण्यात येत असून, 22 वर्षीय तरुणाने हा गुन्हा केला आहे. आरोपीने मुलीचे नाव लिहिण्यासाठी तिच्या दोन्ही गालांवर गरम रॉडने सुमारे 100 वेळा डागले. शनिवारी लखीमपूर खेरी येथे आरोपीला अटक करून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली. आरोपीने पीडितेला मारहाण करून तिच्या चेहऱ्यावर गरम लोखंडी रॉडने 'अमन' नावाचे अक्षरे लिहिली. (हेही वाचा -Uttar Pradesh Shocker: अजब प्रेम की गजब कहाणी, पहिल्याचं नजरेत सासू सोबत जडलं प्रेम, शारिरीक संबंधासाठी सूनेकडून दबाव)

आरोपीवर POCSO कायद्याअंतर्गत कारवाई -

पीडित कुटुंबाचा आरोप आहे की पोलिसांनी सुरुवातीला चुकीच्या पद्धतीने बंदिस्त करणे आणि स्वेच्छेने दुखापत करणे यासारख्या 'कमी' कलमांखाली गुन्हा नोंदवला. तथापि, CrPC च्या कलम 164 अंतर्गत न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर पीडितेचे जबाब नोंदवल्यानंतर, FIR मध्ये POCSO कायद्यासह बलात्काराची कलमे जोडण्यात आली. कुटुंबीयांच्या आरोपांचे खंडन करताना, एसएसपी (खेरी) गणेश साहा म्हणाले की आम्ही त्यांच्या कुटुंबाच्या तक्रारीच्या आधारे एफआयआर दाखल केला आहे.

एसएचओ (धौरहरा) दिनेश सिंह यांनी सांगितलं की, आरोपी हैदराबादमध्ये एका सलूनमध्ये काम करतो. त्याला मुलीशी लग्न करायचे होते. तिने नकार दिल्यावर त्याने तिचे नाव तिच्या दोन्ही गालावर लिहिले. यासंदर्भात कुटुंबियांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.