Coronavirus (Photo Credits: Pixabay)

कोरोनाने (Coronavirus) भारतात अक्षरश: धुमाकूळ घातला असून देशात दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र गेल्या 24 तासांत वाढ झालेल्या रुग्णांच्या संख्येने अक्षरश: कळस गाठला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे तब्बल 4987 रुग्ण आढळले असून हा आकडा जवळपास 5000 च्या आसपास पोहोचल्याचे दिसत आहे. यामुळे देशात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 90,927 वर पोहोचली आहे. तसेच गेल्या 24 तासांत 120 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. सद्य स्थितीत देशात 53,946 रुग्ण उपचार घेत असून 34,109 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर आतापर्यंत एकूण 2872 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असून या राज्यांत एकूण 30, 706 रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ गुजरात मध्ये सर्वाधिक म्हणजेच 10,988 रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ तमिळनाडू, नवी दिल्लीत सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. Atma Nirbhar Bharat Economic Package संदर्भात आज सकाळी 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची अखेरची पत्रकार परिषद

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) वाढता धोका लक्षात घेत घेण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे (Lockdown) अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा केली. तसंच त्यासाठी तब्बल 20 लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आले. या आर्थिक पॅकेजची तपशीलवार माहिती गेल्या 4 दिवसांपासून अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) देत आहेत. आज याचा शेवटचा टप्पा पार पडणार आहे. यासाठी सकाळी 11 वाजता अर्थमंत्री अखेरची पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे आज अर्थमंत्री कोणत्या घोषणा करणार याबाबत उत्सुकता आहे.